“तेल लावा गुपचूप…” घटस्फोटानंतर धनश्री वर्माचा अजून एक व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओवर अश्लील कमेंट्स
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटानंतर धनश्रीचा एक मसाजचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. युजवेंद्रने धनश्रीला 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले आहेत. या व्हिडीओ आणि पोटगीच्या रकमेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटून युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट झाला आहे. युजवेंद्रने धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये दिले आहेत. अनेकजण ही पोटगी अत्यंत कमी असल्याचं म्हणत आहेत. तर काही लोक युजवेंद्रचं समर्थन करत असून धनश्रीला ट्रोल करत आहेत. धनश्री धोकेबाज असल्याचं यूजर्स म्हणत आहेत. तसेच धनश्रीचे जुने व्हिडीओ आणि फोटो आता व्हायरल होत असून नेटकरी कमेंट करत आहेत.
घटस्फोटानंतर तिचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर लोक घाणेरड्या आणि अश्लील कमेंट्स करत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनश्री एका मुलाकडून चंपी करताना दिसत आहे. चांगली झोप यावी म्हणून ती डोक्याची चंपी करताना दिसत आहे.
घटस्फोट देण्याच्या तीन महिन्या आधीचा हा व्हिडीओ
युजवेंद्रला घटस्फोट देण्याच्या तीन महिन्या आधीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत धनश्री एका खुर्चीवर बसलेली दिसत आहेत. एका मुलाकडून ती चंपी करून घेत आहे. इतकी चांगली चंपी कर की मला झोप आली पाहिजे, असं म्हणताना ती दिसत आहे. तिच्यासोबत कोणी तरी अजून बसलंय. त्या व्यक्तीचा आवाज येतो. त्याचवेळी मसाज करणाऱ्या तरुणाला तो व्यक्ती काही तरी विचारते आणि तो होय असं उत्तर देताना दिसत आहे.
View this post on Instagram
धनश्रीचे रुटीन…
तो व्यक्ती म्हणतो, “असं मसाज कर की ज्याने ही हलली पाहिजे”, त्यावर धनश्रीही रिअॅक्ट होते. हा व्हिडीओ धनश्रीने पोस्ट केला तेव्हा त्यावर तिने कॅप्शनही दिलं आहे. “संडे टिप- तेल लावा गुपचूप. पॅकअपनंतरचं माझं रुटीन… एकदम ऑर्गेनिक” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सोबत हसणारे इमोजीही शेअर केले आहेत.
कोर्टाने युजवेंद्रला फटकारले
दरम्यान, युजवेंद्र आणि धनश्रीने वांद्रे येथील फॅमिली कोर्टात घटस्फोट घेतला. कोर्टाने युजवेंद्रला धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तिचा मासिक खर्च म्हणून तिला 2.37 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. बाकी रक्कम न दिल्याने कोर्टाने युजवेंद्रला चांगलेच फटकारले होते. युजवेंद्र आणि धनश्रीने 2020मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या घटस्फोटाला 20 मार्च रोजी मंजुरी मिळाली. गेल्या 18 महिन्यांपासून दोघेही वेगळे राहत होते.