MS Dhoni : काही होणार नाही घाबरू नकोस, मैदानात घुसलेल्या फॅनला धोनीने समजावलं..
इंडियम प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनमध्ये महेंद्र सिंग धोनी च्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला प्लेऑफमध्ये एंट्री मिळाली नव्हती. त्याच सीझनमध्ये गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये एक चाहता मैदानात घुसला. त्याने धोनीला वाकून नमस्कार केला आणि त्याला मिठीही मारली. आता त्याच फॅनचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात चमकदार कामगिरी केली. अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव करून कोलकाताने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. रविवारी, 26 मे रोजी चेन्नईत ही फायनल झाली. पण या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) खराब नेट रनरेटमुळे प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. पण याच सीझनमध्ये मोसमात धोनीसोबत एक विचित्र घटना घडली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या चेन्नईच्या अहमदाबाद येथील सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात घुसला होता. त्याने धोनीला वाकून नमस्कार केला आणि त्याला मिठीही मारली. आता त्या चाहत्याचा एक इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे.
त्या फॅनचं नाव जय जानी असून त्याने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. मैदानावर धोनीसोबत 20-21 सेकंद गप्पा मारल्या. त्याचदरम्यान जयने धोनीला त्याच्या नाकाच्या सर्जरीबद्दल सांगितले. तेव्हा धोनी म्हणाला काळजी करू नकोस, मी तुझ्या सर्जरीचं पाहून घेईन. असं सांगत त्याने जयला धीर दिला.
धोनीने खांद्यावर हात ठेवताच माझी अवस्था
मी तर स्वत:मध्येच मग्न होतं. माही भाई धावू लागला तेव्हा मला वाटलं की तो निघून जाईल आणि माझी भेट होऊ शकणार नाही. मी हात वर केला आणि ओरडलो, सर… तेव्हा माही भाई म्हणाला की मी फक्त मस्ती करतोय मी सरळ त्याच्या पाया पडलो आणि डोळ्यात अश्रूच आले. मग सरळ उठून त्यला मिठीच मारली. ती भावना मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही, असं जय म्हणाला. धोनीने जेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मी भारावून गेलो. त्याने मला विचारलं की एवढा दम का लागलाय ? मी म्हणालो, मी पळत आलोय आणि नाकाचाही त्रास आहे. नाकाची सर्जरी होणार आहे. ते ऐकून धोनी म्हणाला की ते मी सांभाळून घेईन.
काही होणार नाही घाबरू नकोस, धोनीने दिला धीर
‘मी (त्याला) म्हणालो की माझ्या नाकावर शस्त्रक्रिया होणार आहे. मला तुला भेटायचे होतं. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची होती. तेव्हा माही भाई म्हणाला की, ते मी सांभाळून घेईन, तू काळजी करू नकोस.’ असं म्हणत त्याने मला धीर दिला. ‘मी तुला काहीही होऊ देणार नाही. हे लोक (सुरक्षा रक्षक) तुला काहीही करणार नाहीत, काळजी करू नकोस, असं त्याने सांगितलं. ‘मला माझे अश्रू आवरता आले असं म्हणताना जय भावूक झाला होता. त्यानंतर मैदानावर सुरक्षारक्षक मला पकडायला आले, तेव्हाही धोनी भाईने त्यांना समवजावलं. माझ्याशी नीट वागायला सांगितलं. धोनीच्या चाहत्याची ही मुलाखत सध्या खूप व्हायरल झाली आहे.