Video: इशान किशनच्या स्टाईल पुढे धोनी पडला मागे, पाहा काय केलंय
कालच्या सामन्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर या जोडीने चांगली खेळी केली.
कालच्या सामन्यात (IND vs SA 2nd ODI) इशान किशनने (Ishan Kishan) चांगली कामगिरी केली, त्यामुळे रांचीचे (Ranchi) चाहते एकदम खूष असल्याचे पाहायला मिळाले. कारण कालची ज्यावेळी मॅच संपली. त्यावेळी चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. यापुर्वी त्या मैदानात धोनीचे (Mahendrasigh Dhoni) अधिक चाहते असायचे. धोनीने निवृत्ती घेतल्यापासून तिथल्या मैदानात आत्तापर्यंत इतकं प्रेम कोणत्याही खेळाडूला मिळालं नव्हतं.
Fan interactions with local lad @ishankishan51 ??
हे सुद्धा वाचाP.S. – Also, Ishan delivers a special fan note to @imShard ☺️? #TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/6DWYVmNohh
— BCCI (@BCCI) October 9, 2022
कालच्या सामन्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर या जोडीने चांगली खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाचा आफ्रिकेवरती विजय मिळविला. आता दोन्ही टीमनी एक-एक सामना जिंकला आहे.
ज्यावेळी टीम इंडिया जिंकली, त्यावेळी इशान किशनने काही चाहत्यांची पॅव्हेलियनमध्ये जाऊन भेट घेतली. एका आजीच्या पायाला स्पर्श केल्यानंतर त्यांच्याशी इशान गप्पा मारित आहे. तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत.