नवी दिल्ली: आयपीएल मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. सीएसकेने दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल संघाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटलने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. धोनीच्या चेन्नईने हे आव्हान 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने 26 चेंडूत 44 तर सुरेश रैनाने 16 चेंडूत 30 धावा ठोकल्या. त्यामुळे चेन्नईल सोपा विजय मिळवता आला.
त्याआधी दिल्लीकडून शिखर धवनने 47 चेंडूत 51 धावा केल्याने, दिल्लीला रडत कढत 147 धावांचा टप्पा गाठला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही. पंतने 13 चेंडूत 25 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने केवळ 1 षटकार आणि 2 चौकार मारले.
धोनीच्या लेकीचा पाठिंबा
दरम्यान, या सामन्यावेळी धोनीची पत्नी आपल्या लेकीसह प्रेक्षक गॅलरीत होती. धोनीची लेक झिव्हाने नेहमीप्रमाणे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. धोनी मैदानात होता, त्यावेळी धोनीची लेक पापा पापा अशी ओरडत होती. आपल्या बापाला झिव्हा प्रोत्साहन देत होती. आई साक्षीच्या मांडीवर उभी राहून झिव्हा पापा पापा अशी मोठ्याने ओरडत होती.
VIDEO:
‘Paaapaaaaa, comeon papaa!’ What better than cheering for your dad at his workplace?! #Ziva #WhistlePodu #Yellove #DCvCSK ?? pic.twitter.com/FC5Wxo0GyB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 26, 2019