दुसऱ्या कसोटीदरम्यान दिनेश कार्तिक आणि मार्क वॉ यांच्यात ‘त्या’ वक्तव्यावरून जुंपली, नेमकं काय झालं वाचा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामना सुरु असताना समालोचक दिनेश कार्तिक आणि मार्क वॉ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत असल्याचं पाहून संजय मांजरेकर यांनी उडी घेत वाद शमवला. नेमकं काय झालं वाचा

दुसऱ्या कसोटीदरम्यान दिनेश कार्तिक आणि मार्क वॉ यांच्यात 'त्या' वक्तव्यावरून जुंपली, नेमकं काय झालं वाचा
मार्क वॉनं असं काय बोललं की दिनेश कार्तिकनं तिथल्या तिथे सुनावलं, कशावरून झाला वाद वाचा
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 4:09 PM

मुंबई : चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर वरचढ झाला आहे. दोन्ही सामने तिसऱ्या दिवशीच आपल्या खिशात घातले आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. असं असताना दुसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ आणि दिनेश कार्तिक यांच्यात जुंपली. ऑस्ट्रेलियाची सुमार कामगिरी पाहून मॉर्क वॉ चांगलाच संतापला होता.समालोचन करताना तो संघाला वारंवार सूचना करत होता. चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना मार्क वॉचा पारा आणखी चढला. पुजारा स्ट्राईकवर असताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर त्याने नाराजी व्यक्त केली.वॉ ऑस्ट्रेलियन कर्णधाराला झापताना पाहून दिनेश कार्तिकने एंट्री घेतली.त्याचबरोबर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 115 धावांचं आव्हान दिलं होतं. केएल राहुलच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिलं यश मिळालं. भारताची स्थिती 6 वर 1 गडी बाद अशी असताना चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. त्यानंतर त्याने खेळपट्टीवर तग धरला. भारताची 31 वर 1 गडी बाद अशी स्थिती असताना कर्णधाराने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर मार्क वॉने नाराजी व्यक्त केली. वॉने सांगितलं की, “प्रामाणिकपणे सांगायचं तर, मी या क्षेत्ररक्षणामुळे हैराण झालो आहे. मला विश्वासच बसत नाही मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही. तुमच्याकडे 100 च्या आसपास धावा असताना पुजारा संघर्ष करताना दिसत आहे. तो ऑफ साइटला पॅडवरून चेंडू मारत आहे. निश्चितपणे तुम्हाला ऑफ साईडला बॅट पॅड जवळ क्षेत्ररक्षक ठेवायला हवा.”

मार्क वॉनं असं सांगताच दिनेश कार्तिकनं प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रश्न उत्तरात वाद आणखी चिघळत गेला. नेमकं काय झालं वाचा

  • दिनेश कार्तिक : मला वाटते क्षेत्ररक्षणामुळे तुम्ही खूश नाहीत. नेमकं तुम्ही कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रीत करत आहात?
  • मार्क वॉ : मला ऑफ साईड बॅड पॅडवर खेळाडू हवा. तसेच मी पॉईंटचा खेळाडू वर घेऊ इच्छितो. त्यामुळे एक चांगलं क्षेत्ररक्षण ठरू शकतं.

नेमकं त्याचं वेळी पुजाराने पॉईंटवरून शॉट खेळल्याने मार्क वॉ नाराज झाला. तेव्हा कार्तिकने पुन्हा एकदा प्रश्न विचारला

  • दिनेश कार्तिक : मार्क, जर खेळाडू पॉईंटचा वर घेतला असता तर डोक्यावरून चौकार गेला असता.
  • मार्क वॉ : खेळाडू पॉईंटपेक्षा वर असता तर हा चेंडू त्याच्या हातात असता
  • दिनेश कार्तिक : तुम्हाला नाही वाटत का? त्या शॉट खेळण्यासाठी गॅप मिळाला असता. कारण त्याच्याकडे शॉट खेळायला खूप वेळ होता.
  • मार्क वॉ : मी वेगळा विचार करत आहे मी पुजाराच्या बाबतीच बोलत आहे.त्याच्यासाठी बॅट पॅड ऑफ साईड खेळाडू हवा. त्याला आउट करण्याची संधी आहे.
  • दिनेश कार्तिक : पण हे क्षेत्ररक्षण रोहित शर्मासाठी नसेल. त्याच्याबाबत काहीच बोलत नाही.
  • मार्क वॉ : मी रोहित शर्माबाबत काहीच बोलत नाही. तो पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे. डीके
  • दिनेश कार्तिक : तर या फिल्डिंगमुळे तुम्ही खूश आहात तर? तिथे रोहित शर्मासाठी कोणीच नाही. याबाबत तुम्ही समाधानी आहात. तु्म्ही कर्णधार असताना असाच निर्णय घ्याल.
  • मार्क वॉ : मला नव्हतं माहिती की, ही एक पत्रकार परिषद आहे
  • दिनेश कार्तिक : थोडी मस्ती करत आहे.
  • मार्क वॉ : मी तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं सेशन आता कमी करत आहे. तुला प्रत्येक सेशनला फक्त एकच उत्तर मिळेल. समजलं ना

या दोघांचा शाब्दिक वाद पाहून समालोचक संजय मांजरेकर यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण शांत केलं. चला या वादात आता मी उडी घेत आहे आणि सध्याची धावसंख्या वाचत आहे. असं सांगून वेळ मारून नेली.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.