Ind vs Sa 3rd T20 : दिनेश कार्तिकची चौकार षटकारांची बरसात, सोशल मीडियावर धुमाकूळ
टीम इंडियाच्या फलंदाजांची कालच्या सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही
कालच्या सामन्यात दिनेश कार्तिकने (dinesh karthik) चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा आहे. काल झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची टीम धावसंख्या 227 झाली होती.
The @DineshKarthik show ?? 46 runs 21 balls 4 Fours and as many Sixes!
हे सुद्धा वाचाTalk about a quick-fire knock.
Live – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/6H4AyfdSiz
— BCCI (@BCCI) October 4, 2022
टीम इंडियाच्या फलंदाजांची कालच्या सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. कालच्या सामन्यात दिनेश कार्तिकने त्याची खूप दिवसांनी चांगली बॅटिंग दाखवली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे मीम्स अधिक व्हायरल झाले आहेत.
Dinesh Karthik scored 46 in 21, including 32 in his last ten deliveries during the third T20I against South Africa. ??#INDvSA #DineshKarthik #T20Is pic.twitter.com/zKiDuDwzs9
— SportsViz (@viz_sports) October 4, 2022
कालच्या सामन्यात ना विराट, ना केए राहुल ना हार्दिक पांड्या अशी स्थिती होती, त्यामुळे अनेक नव्या खेळाडूंना त्यांच्या जागेवर संधी देण्यात आली होती. अनेक दिवसांनी संधी मिळालेला दिनेश कार्तिक आफ्रिकेच्या गोलंदाजावरती तुटून पडला होता.
कार्तिकने 21 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने 46 धावा काढल्या. विशेष म्हणजे चुकीचा फटका मारत असताना तो बाद झाला. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांची मने कार्तिकने काल नक्की जिंकली आहेत.