गांगुलीच्या नेतृत्त्वात विश्वचषक खेळला, 42 वर्षीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला अलविदा
भारताचा माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) यांनी वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (Dinesh Mongia retired) जाहीर केली आहे.
Dinesh Mongia retired नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर दिनेश मोंगियाने (Dinesh Mongia) वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (Dinesh Mongia retired) जाहीर केली आहे. दिनेश मोंगिया 2003 मध्ये माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या नेतृत्वात विश्वचषकाचा (Dinesh Mongia retired) अंतिम सामना खेळला होता. दिनेश मोंगियाने काल (17 सप्टेंबर) निवृत्तीची घोषणा केली.
मोंगियाने 2007 मध्ये पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. मात्र त्यानंतर भारतीय क्रिकेट लीगमध्ये (Dinesh Mongia retired) खेळल्याच्या कारणावरुन बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती.
दिनेश मोंगियाने 1995-96 पंजाबकडून पदार्पण केले होते. मोंगियाने 2002 मध्ये झिंम्बाब्वे विरुद्ध खेळताना 159 धावा केल्या होत्या. त्याच्या या धावांमुळे भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली होती. मात्र विश्वचषकानंतर त्याने काही खास कामगिरी केली नाही. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी (Dinesh Mongia retired) घातल्यानंतर तो क्रिकेटपासून (Dinesh Mongia retirement) लांब राहिला.
मोंगियाने कारकिर्दीत 57 वनडे खेळले असून एक टी-20 सामना खेळला आहे. यात त्याने जवळपास 1268 धावा केल्या आहेत.