T20 विश्वचषक स्पर्धेतील या दहा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
यंदाचा विश्वचषक कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.
मेलबर्न : आतापर्यंत प्रत्येक टीमच्या (Team) तीन मॅचेस (matches) झाल्या आहेत. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड (Record) सुद्धा झाले आहेत. या सगळ्यामध्ये श्रीलंकेचे खेळाडू आघाडीवर आहेत. यंदाचा विश्वचषक कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. परंतु रेकॉर्ड झालेल्या दहा महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या…
- दक्षिण आफ्रिका टीमने बांग्लादेश टीमच्या विरुद्ध 205 धावा केल्या आहेत.
- दक्षिण आफ्रिका टीमने बांग्लादेश टीमच्या विरुद्ध 104 धावांनी विजय मिळविला आहे.
- श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज कुसल मेंडिस याने आतापर्यंत 180 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 156.52 इतका आहे.
- आफ्रिकेच्या रिली रोसो याने बांगलादेशच्या विरोधात 109 रणांची खेळी केली आहे.
- आफ्रिकेच्या रिली रोसो याने आतापर्यंत 8 षटकार मारले आहेत.
- श्रीलंका टीमचा गोलंदाज वानिंदु हसरंगा याने 6 सामन्यात दहा विकेट घेतल्या आहेत.
- इंग्लंडचा गोलंदाज सेम करन ने आफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 3.4 ओव्हरमध्ये 10 रण देऊन पाच विकेट घेतल्या आहेत.
- दक्षिण अफ्रीकेचा विकेटकीपर क्विंटन डिकॉक याने चांगली विकेट किपिंग करुन सहा जणांना बाद केले आहे.
- दक्षिण आफ्रिकेचा रिली रोसो आणि क्विंटन डिकॉक या दोघांनी 168 धावाची महत्त्वपुर्ण भागादारी केली आहे.
- श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने सहा मॅचमध्ये सहा कॅच पकडले आहेत.
हे सुद्धा वाचा