Article 370 | बेटा, तू काळजी करु नको, पाकव्याप्त काश्मीरचाही मुद्दा सोडवू, गंभीरचं आफ्रिदीला उत्तर

पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही (Shahid Afridi )  काश्मीरच्या (Jammu Kashmir) मुद्द्यावरुन प्रक्षोभक ट्विट केलं. त्याला भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) चांगलंच उत्तर दिलं.

Article 370 | बेटा, तू काळजी करु नको, पाकव्याप्त काश्मीरचाही मुद्दा सोडवू, गंभीरचं आफ्रिदीला उत्तर
Follow us
| Updated on: Aug 06, 2019 | 1:11 PM

Jammu Kashmir Article 370 मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही (Shahid Afridi )  काश्मीरच्या (Jammu Kashmir) मुद्द्यावरुन प्रक्षोभक ट्विट केलं. त्याला भारतीय युजर्सनी उत्तर दिलं. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) आफ्रिदीला चांगलंच झोडपलं.

आफ्रिदी काय म्हणाला?

काश्मीरप्रश्नी शाहीद आफ्रिदीने ट्विट केलं. “संयुक्त राष्ट्राच्या नियमानुसार काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत. आपल्याला जसा स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो त्यांनाही मिळावा. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का केली आहे? आता संयुक्त राष्ट्र झोपा काढतंय का? काश्मीरमध्ये मानवतेविरोधात होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची नोंद घ्यायला हवी. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका स्वीकारावी” असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.

गंभीरचं टीकास्त्र

शाहीद आफ्रिदीच्या या ट्विटला गंभीरने उत्तर दिलं. “शाहीद आफ्रिदी योग्य बोलतोय. विनाकारण आक्रमकता आहे, मानवतेविरुद्ध अपराध होत आहेत. हा मुद्दा उचलून धरण्यासाठी आफ्रिदीचं कौतुक व्हायला हवं. मात्र तो केवळ एक मुद्दा लिहायला विसरला, तो म्हणजे हे सर्व अत्याचार पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत. पण काळजी करु नको, आम्ही तो मुद्दाही सोडवू, बेटा”

कलम 370 हटवलं

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

संबंधित बातम्या 

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह   

उरीचा बदला ते कलम 370, मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय 

Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं! 

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.