T20 World Cup: या कारणामुळे टीम इंडियातील खेळाडू टप्याटप्याने भारतात परतणार
टीम इंडियाचे खेळाडू टप्याटप्याने भारतात दाखल होतील.
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) काल लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर खेळाडू आता टप्याटप्याने भारतात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज काही खेळाडू ऑस्ट्रेलियातून (Australia) मायदेशी परतणार आहेत. तर उद्या रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सात खेळाडू भारतात दाखल होणार आहेत. काही दिवसात न्यूझिलंडविरुद्ध T20 आणि वनडे मालिका होणार आहे. त्या मालिकेसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू तिथूनचं न्यूझिलंडला जाणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
काही खेळाडूंना इंडियामध्ये येण्यासाठी आजचं तिकीटं मिळालं आहे. तर काही खेळाडूंना उद्याचं तिकीट मिळालं आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू टप्याटप्याने भारतात दाखल होतील.
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेमध्ये नाही. त्यामुळे हे खेळाडू दोन टप्प्यात मायदेशी परतणार आहेत.
सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू ऑस्ट्रेलियातून थेट न्यूझिलंडला जाणार आहेत.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र, चहलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे वेळापत्रक
18 नोव्हेंबर, शुक्रवार: पहिली मॅच T20, वेलिंग्टन 20 नोव्हेंबर, रविवार: दुसरी मॅच T20, माउंट मौनगानुई 22 नोव्हेंबर, मंगळवार: तिसरी मॅच T20, ऑकलंड
25 नोव्हेंबर, शुक्रवार: पहिला एकदिवसीय सामना, ऑकलंड 27 नोव्हेंबर, रविवार: दुसरा एकदिवसीय सामना, हॅमिल्टन 30 नोव्हेंबर, बुधवार: तिसरा एकदिवसीय सामना, क्राइस्टचर्च