1000 पेक्षा अधिक विकेट्स, एका डावात 10 बळी, चायनामॅन बोलचा अविष्कार करणाऱ्या अवलियाचा जन्मदिन

अ‍ॅलिस एडगर अचॉंग (ellis achong) यांना चायनामन गोलंदाजीचा जनक म्हटलं जातं.

1000 पेक्षा अधिक विकेट्स, एका डावात 10 बळी, चायनामॅन बोलचा अविष्कार करणाऱ्या अवलियाचा जन्मदिन
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:38 AM

मुंबई : क्रिकेट विश्वात  (Cricket) दररोज अनेक दिग्ग्ज क्रिकेटपटूंचे जन्मदिवस असतात. पण आजच्या दिवशी अशा एका क्रिकेटपटूचा जन्म झाला ज्याने क्रिकेटला चायनामॅन बोल दिला. अर्थात या खेळाडूने चायनामॅन बोलचा अविष्कार केला. एलिस एडगर एचोंग (Ellis Edgor Achong) यांचा आजच्या दिवशी 16 फेब्रुवारी 1904 मध्ये त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये जन्म झाला. एलिस यांना पस एचोंग या नावानेही ओळखले जायचे. एचोंग डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज होते. त्याने वेस्ट इंडिजकडून सहा कसोटी सामने खेळले आणि 8 विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर 38 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 110 बळी मिळवल्या. पण लँकशायर लीगमधील त्याची गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली. येथे त्याने 1000 हून अधिक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (ellis achong birthday who invented chinaman bowl)

एचॉंग हे कसोटी क्रिकेट खेळणारे चीनमधील पहिलेच नागरिक होते. यामुळेच त्यांना चायनामन गोलंदाज असेही म्हटले जायचे. या व्यतिरिक्त आणखी एक भन्नाट गोष्ट आहे. ज्यामुळे ‘चायनामॅन’ ही संज्ञा पहिल्यांदा वापरण्यात आली.

गोष्ट आहे 1933 सालची. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये ही मॅच सुरु होती. एचोंग यांनी इंग्लंडच्या वाल्टर रोबिन्सचा शानदार चेंडूवर त्रिफळा उडवला. एचोंगने टाकलेला चेंडू ऑफ साईडला पडला. उजव्या हाताच्या रोबिन्सला चकवा देत हा चेंडू आतल्या बाजूने टर्न होत स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे रोबिन्सला समजण्याआधी तो आऊट झाला. यामुळे तो चिडला. आता फक्त एका चायनामॅन बोलरकडून आऊट व्हायचंच राहिलं होतं, अशी संतप्त प्रतिक्रिया रोबिन्सने दिली. तेव्हापासून चायनामॅन ही टर्म वापरात आली.

एका डावात 10 विकेट्स

या दौऱ्यानंतर एचॉंगने लग्न केलं. लग्नानंर एचॉंग इंग्लंडमध्येच स्थायिक झाले. येथे एचॉंग लँकशायर लीगमध्ये खेळत राहिले. एचॉंगने 1945 मध्ये टॉडमॉर्डन संघाविरुद्ध खेळताना अफलातून कामगिरी केली. त्यांनी एका डावात चक्क सर्व टीमला ऑल आऊट करण्याची कामगिरी केली. अर्थात एका डावात 10 विकेट्स घेतल्या.

फुटबॉल पहिलं प्रेम

फुटबॉल एचॉंगचं पहिलं प्रेम होतं. क्रिकेटर होण्यआधी ते फुटबॉल खेळायचे. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत पोर्ट ऑफ स्पेनमधील स्थानिक संघात लेफ्ट विंगर म्हणून खेळायचे. क्रिकेटमध्ये काही वर्ष खेळल्यानंतर त्यांनी अंपायरगिरी केली. त्यांनी 1953-54 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पंचाची भूमिका पार पाडली होती. यानंतर त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो टीमच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. ही जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली.

संबंधित बातम्या :

Kieron Pollard | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी कायरन पोलार्डचा धमाका, अवघ्या 3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स

नागालँडचा एकलव्य, शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहून फिरकी शिकला, आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज

(ellis achong birthday who invented chinaman bowl)

HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.