ब्राझीलच्या सर्वोत्तम फूटबॉलपटू बालबाल बचावला; चोराने रोखली बंदूक, गोळ्या ही झाडल्या

इमर्सन टोटेनहॅम हॉटस्पर या इंग्लिश फुटबॉल क्लबकडून खेळतो, परंतु सध्या तो ब्राझीलमधील त्याच्या घरी सुट्टी घालवत आहे आणि त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवत आहे. गेल्या मोसमात त्याने या क्लबसाठी 41 सामने खेळले होते.

ब्राझीलच्या सर्वोत्तम फूटबॉलपटू बालबाल बचावला; चोराने रोखली बंदूक, गोळ्या ही झाडल्या
इमर्सन रॉयलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 11:01 AM

ब्राझील : त्याचे नशीव बलवत्तर होते म्हणून धोका टळला. समोर दरोडेखोर (Robbers) हातात बंदुक आणि काही क्षणात फैरी झाल्याचा आवाज. पण दैव बलवत्तर म्हणून ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी (Brazil’s best footballers) एकाचा जीव वाचला. तो थोडक्यात बचावला तेही एका ऑफ-ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यामुळे. इमर्सन रॉयल (Emerson Royal) हा ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक. तो एका जीव घेण्या अपघातातून थोडक्यात बचावला. त्याच्याबरोबर दरोड्याची घटना घडली. परंतु इमर्सनचे कोणतेही नुकसान झाले नाही. कारण एक पोलीस कर्मचारी तेथे होता. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांशी झुंज देत इमर्सनला वाचवण्यात यश मिळविले. मात्र त्यादरम्यान दोघांमध्ये गोळीबार झाला. ज्यामुळे तेथे काही काळ वातावरण तंग बनले होते.

बीबीसीच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने हल्लेखोराला पकडले आणि दोघांमध्ये गोळीबार झाला. मात्र, यादरम्यान फुटबॉलपटूला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. इमर्सनने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “मी तुमचा सदैव ऋणी राहीन. देव या भूमीवर देवदूत पाठवतो, याचा पुरावा मला माझ्या आयुष्यात दररोज मिळतो. मी या माणसाला देवदूत म्हणतो, माझा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. ज्यावेळी इमर्सनवर दरोडेखोरोने बंदुक रोखली होती आणि त्याच्या सामानाची मागणी करत होता. त्यावेळी तेथे एक ऑफ-ड्युटी पोलीस कर्मचारी ब्राझीलमधील नाईट क्लबच्या बाहेर इमर्सनचे फोटो काढत होता. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने इमर्सनला या चोरापासून वाचवले.

दोघांमध्ये 29 राउंड फायरिंग झाल्या

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर आणि पोलिसात 29 राउंड फायरिंग झाल्या. दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याचा जीव धोक्याबाहेर आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री तीन वाजता तो नाईट क्लबमधून बाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत ही घटना घडली. इमर्सनच्या वडिलांनी ग्लोबो एस्पोर्ट वृत्तपत्राला सांगितले की, “मी आनंद साजरा करत होतो, बाहेर येत असताना हा अपघात घडला जो खूप वाईट आहे. चोराने इमर्सनकडे त्याचे घड्याळ आणि इतर वैयक्तिक सामान मागितले होते.”

घरी सुट्टी घालवणे

इमर्सन टोटेनहॅम हॉटस्पर या इंग्लिश फुटबॉल क्लबकडून खेळतो, परंतु सध्या तो ब्राझीलमधील त्याच्या घरी सुट्टी घालवत आहे आणि त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवत आहे. गेल्या मोसमात त्याने या क्लबसाठी 41 सामने खेळले होते. स्पेनच्या दिग्गज फुटबॉल क्लब बार्सिलोना येथून तो इंग्लंडच्या क्लबमध्ये पोहोचला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.