Prithvi Shaw : ‘देवा तुला सगळं दिसतंय ना…’, संघात निवड न झाल्याने पृथ्वी शॉसह युवा खेळाडूंच्या भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
नवी दिल्ली : न्यूझीलंड (New Zealand) आणि बांगलादेश (Bangladesh) मालिकेसाठी टीम इंडियामध्ये (Team India) अनेक युवा खेळाडूंना डावलण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. काल टीम इंडियाची घोषणा झाली, त्यानंतर काही क्षणात युवा खेळाडूंनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ज्या खेळाडूंनी जाहीरपणे सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडिया त्यांच्या चाहत्यांनी व्हायरल केल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत ज्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, त्यापैकी अनेक खेळाडूंना न्यूझिलंड आणि बांगलादेश मालिकेत आराम दिला आहे.
Selection reviews feat Indian cricketers pic.twitter.com/rAkk7dpTfC
— mon (@4sacinom) October 31, 2022
पृथ्वी शॉ ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तरीही डावलण्यात आल्याने तो निराश झाला आहे. कालची खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर त्याने “मला अशा आहे, की देवा तु हे सगळं पाहतोय” अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
पृथ्वी शॉ, नीतीश राणा, रवि बिश्नोई आणि उमेश यादव या खेळाडूंनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. सगळ्यांच्या पोस्टची सोशल मीडिय़ावर चर्चा सुरु आहे.
बांगलादेश वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया:
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हरदीप सिंग. पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अरविंद चहल. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक