ENG vs BAN, WWC 2022 : बांगलादेशला दणका..! इंग्लंड सेमी फानयलमध्ये, आता नजरा भारत-दक्षिण आफ्रिका मॅचवर…
ICC Women’s World Cup 2022 : वेलिंग्टनमध्ये (Wellington) खेळल्या गेलेल्या करा किंवा मरोच्या सामन्यात बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करून त्यांनी ही कामगिरी केली. इंग्लंडने बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ICC Women’s World Cup 2022 : आयसीसी महिला विश्वचषक 2022ची उपांत्य फेरी खेळणाऱ्या तिसऱ्या संघाचे नावही निश्चित झाले आहे. इंग्लंडने (England) तिसऱ्या क्रमांकासाठी तिकीट निश्चित केले आहे. वेलिंग्टनमध्ये (Wellington) खेळल्या गेलेल्या करा किंवा मरोच्या सामन्यात बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करून त्यांनी ही कामगिरी केली. इंग्लंडने बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी इंग्लंडला बांगलादेशला हरवणे आवश्यक होते आणि त्यांनी ते उत्तमरित्या पार पाडले. या स्पर्धेतील इंग्लंडचे हे यशही वाखाणण्याजोगे आहे. कारण पहिले 3 सामने गमावल्यानंतर त्यांनी असे केले आहे. लीग स्टेजवरील पहिले 3 सामने गमावल्यानंतर इंग्लंडने पुढचे चार सामने नेत्रदीपक पद्धतीने जिंकले. आता त्यांचे आठ गुण झाले असून ते उपांत्य फेरीत चपखल आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याकडे सर्वांचे लक्ष
इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडप्रमाणेच भारतालाही उपांत्य फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
सोफिया डंकलेचे अर्धशतक
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडची सुरुवातही चांगली झाली नाही. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडत राहिल्या. एकवेळ स्कोअर बोर्डवर 100 धावाही नव्हत्या आणि त्यांचे टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये होते. पण मधल्या फळीत सोफिया डंकलेने अप्रतिम खेळी करत संघाला 200च्या पुढे नेण्यात यश मिळवले. इंग्लंडने 50 षटकांत 6 बाद 234 धावा केल्या.
इंग्लंडने बांगलादेशचा केला 100 धावांनी पराभव
आता बांगलादेशसमोर 235 धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येमध्ये त्यांनी लवकर विकेट गमावल्या नाहीत, परंतु धावफलकाचा वेग मंद होता. याचा परिणाम असा झाला, की ना विकेट राहिली ना स्कोअर बोर्ड वाढला. अवघ्या 134 धावा करून संपूर्ण संघ बाद झाला आणि 100 धावांनी सामना हरला.
इंग्लंड उपांत्य फेरीत, आता भारताची पाळी
इंग्लंड संघाने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता भारताची पाळी आहे, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 275 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. भारताने असे केले तर उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित होईल.