England Tour Sri Lanka | श्रीलंके विरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.
कोलंबो : नववर्षात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघ श्रीलंका (England Tour Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या श्रीलंका दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय इंग्लड संघाची घोषणा करण्यात आली आहे. खरंतर ही कसोटी मालिका मार्च 2020 मध्ये खेळण्यात येणार होती. मात्र कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) ही कसोटी मालिका स्थगित करण्यात आली. या कसोटी मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरला विश्रांती देण्यात आली आहे. England announce squad for Test series against Sri Lanka
We have named our squad for our men’s Test tour of Sri Lanka! ?????????
— England Cricket (@englandcricket) December 11, 2020
इंग्लंडच्या संघात जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली या अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. तसेच निवड समितीने 16 सदस्यीय खेळाडूंसह 7 राखीव खेळाडूंनाही या श्रीलंका दौऱ्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेसाठी 2 जानेवारी 2020 ला निघणार आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेत पोहचल्यानंतर हंबनटोटा येथे क्वारंटाईन येथे राहणार आहेत. या क्वारंटाईन कालावधी दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना सराव करण्याची मुभा असणार आहे. 5 ते 9 जानेवारी दरम्यान महेंद्रा राजपक्षे स्टेडियमवर सराव सामना खेळला जाणार आहे. यानंत 14 जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना- 14 ते 18 जानेवारी , गाले स्टेडियम
दुसरा कसोटी सामना – 22 ते 26 जानेवारी, गाले स्टेडियम
इंग्लंडचा कसोटी संघ : जो रूट (कप्तान), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, जैक क्राउली, सैम करन, बेन फोक्स, डेन लॉरेंस, जैस लीच, डोम सिबली, ऑली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड
राखीव खेळाडू : जेम्स ब्रेसी, मेसन क्रेन, शकिब महमूद, क्रेग ऑवर्टन, मैथ्यू पर्किंसन, ऑली रॉबिनसन, अमर विरदी
दरम्यान इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याआधी श्रीलंका क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात श्रीलंका एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?
England announce squad for Test series against Sri Lanka