हरमनप्रीत-मंधानानं धू धू धुतलं, इंग्लंडनं गुडघे टेकले, टीम इंडियाचा विजय

काऊंटी ग्राउंडवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. या दोघींशिवाय यास्तिका भाटियानेही शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याविषयी जाणून घ्या...

हरमनप्रीत-मंधानानं धू धू धुतलं, इंग्लंडनं गुडघे टेकले, टीम इंडियाचा विजय
हरमनप्रीत-मंधानासमोर इंग्लंडनं गुडघे टेकले
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 6:34 PM

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघानं (Womens Cricket Team) होव्ह येथील काऊंटी ग्राउंडवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा (ENG vs IND) सात गडी राखून पराभव केला. या दोघींशिवाय यास्तिका भाटियानेही शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 50 षटकांत 7 गडी गमावून 227 धावांवर रोखले. भारताने हे लक्ष्य तीन गडी गमावून पूर्ण केले.

आयसीसीचं ट्विट

शानदार खेळी

भारताकडून मंधानानं शानदार खेळी खेळली आणि 91 धावा केल्या. या डावात तिनं 99 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकारांसह एक षटकार ठोकला. भाटियानं 47 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली ज्यात तिनं 8 चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार हरमनप्रीत 74 धावांवर नाबाद राहिली. तिनं 94 चेंडूंचा सामना केला आणि सात चौकारांसह एक षटकार ठोकला.

चांगली सुरुवात नाही

228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मात्र चांगली सुरुवात करता आली नाही. दुसऱ्या षटकातच संघाने शेफाली वर्माची विकेट गमावली. ती एक धाव काढून बाद झाली. यानंतर भाटिया आणि मंधाना यांनी संघाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. एकूण 99 धावांवर भाटिया बाद झाला.

मंधाना-कौरची भागीदारी

मंधानाला कर्णधाराची साथ मिळाली आणि त्यानंतर दोघींनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा कडवा क्लास घेतला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. मंधना एकूण 119 धावांवर बाद झाली. पण तिनं संघाला विजयाच्या जवळ आणलं होतं. कर्णधार हरमनप्रीतनं हे काम शेवटपर्यंत नेलं. ती शेवटपर्यंत विकेटवर राहिली आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतली. हरलीन देओल सहा धावा करून नाबाद परतली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.