काय चालंय…! इंग्लंडच्या खेळाडूने कपडे काढून घेतला झेल, Video सोशल मीडियावर व्हायरल
इंग्लंड विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका सुरु आहे. तीन सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेसाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी वेगळ्याच पद्धतीने सराव केला. आता या सरावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंबई : ‘कॅचेस विन द मॅचेस’ ही म्हण क्रिकेट जाणकारांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. महत्त्वाच्या सामन्यात झेल सोडण्यासारखं मोठं पातक होऊ शकत नाही. कारण एकदा का खेळाडूला जीवदान मिळालं की, तो त्याची कसर भरून काढतो. अनेकदा विजयाचा तोंडातला घास हिरावून जातो. अशी अनेक उदाहरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे क्रिकेटपटू फलंदाजी, गोलंदाजीसोबत झेल घेण्याचा सराव करतात. बांगलादेश दौऱ्यावर असलेली इंग्लंडची टीम यासाठी जोरदार सराव करत आहे. खासकरून झेल घेण्याचा सराव सुरु आहे. मात्र या सरावात इंग्लंडच्या मार्क वूडनं कपडे काढून झेल घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इंग्लंडचे खेळाडू झेल पकडण्याचा सराव करत आहे. तेव्हा चेंडू वर आकाशात जाताना मार्क वूड पाहतो. तेव्हा तो पहिल्यांदा टोपी काढतो. त्यानंतर टीशर्ट काढतो आणि शेवटी ट्रेनिंग शॉर्ट काढून झेल घेतो.
?What a way to grab a catch!#CricketTwitter #ENGvBAN pic.twitter.com/C4TQkrOqxz
— SJM?? (@SheikhM75834079) February 26, 2023
मार्क वूडनं असं का केलं?
मार्क वूडनं अशा प्रकारे झेल घेण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. झेल घेण्यासाठी खरंच कपडे काढण्याची गरज आहे का? वगैरे असे प्रश्न विचारले जात आहेत. खरं तर इंग्लंडचे खेळाडू झेल घेताना लक्ष विचलीत होऊ नये यासाठी असा सराव करत आहे. मार्क वूड कपडे काढले खरे पण त्याचं सर्व लक्ष चेंडूवरच होतं. शेवटी त्याने इतकं करूनही झेल घेतला.
पहिल्या वनडेत इंग्लंडचा विजय
तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडी घेतली आहे.बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात 47.2 षटकात सर्वबाद 209 धावा केल्या आणि विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने हे लक्ष्य 48.4 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं. मार्क वूडनं या सामन्यात मुशफिकर रहिमचा चांगला झेल घेतला.
दोन्ही संघांचे खेळाडू
बांगलादेशचा संघ- तामिम इकबाल, लिटॉन दास, नजमुल होसैन शांतो, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, अफिफ होसैन, मेहिदी हसन, तास्किन अहमद, तैजुल इस्लाम, मुस्ताफिझुर रहमान
इंग्लंडचा संघ – जेसन रॉय, फील सॉल्ट, डेविड मलान, जेम्स विन्स, जोस बटलर, विल जॅक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, अदिल राशीद, जोफ्रा आर्चर, मार्क वूड