पाकिस्तानचं (Pakistan) जेवण न आवडल्याचं जाहीरपणे इंग्लंडच्या (England) खेळाडूने बोलून दाखवलं आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 टी 20 मॅचेस झाल्या. दोन्ही बाजूच्या खेळाडूंची चांगली खेळी केली. परंतु अंतिम मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी (Player)चांगली कामगिरी केली नाही म्हणून पाकिस्तानची टीम पराभूत झाली.
बाबर आझम, मोहम्मद रिझवान या दोन खेळाडूंशिवाय कोणत्याही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे पाकिस्तानची टीम हारली. कारण मागच्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर पाकिस्तानच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे.
आशिया चषकात सुद्धा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची अधिक चर्चा होती. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषक होणार आहे.
इंग्लंडचा खेळाडू याने पाकिस्तानमधील जेवणं आवडलं नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याची सुद्धा सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले आहेत.
विशेष म्हणजे पत्रकारांनी मोईन अलीला काही प्रश्न विचारले, त्यावेळी कराची मधील जेवणं चांगलं होतं. परंतु लाहौरमधील जेवणं आवडलं नसल्याचं सांगितलं.