ENG vs WI : 117 दिवसांनी क्रिकेटपटू मैदानात, ना प्रेक्षक, ना एकमेकांची गळाभेट, नवे नियम काय?

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा चौकार-षटकार पाहायला मिळणार आहेत.इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. Eng vs WI first test

ENG vs WI : 117 दिवसांनी क्रिकेटपटू मैदानात, ना प्रेक्षक, ना एकमेकांची गळाभेट, नवे नियम काय?
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 11:31 AM

लंडन : तब्बल चार महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा चौकार-षटकार पाहायला मिळणार आहेत. कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. खेळाडू जरी मैदानात असले, तरी हा सामना विनाप्रेक्षक असेल. इंग्लंडमधील साऊदम्पटनमध्ये हा सामना खेळवला जात आहे. (Eng vs WI first test)

जगभरातील कोरोना संकटानंतर तब्बल 117 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होत आहे. जवळपास 46 वर्षानंतर ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना होऊ शकलेला नाही.(Eng vs WI first test)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यासाठी प्रचंड खबरदारी घेण्यात आली आहे. टाळ्या शिट्या वाजवायला मैदानात प्रेक्षक उपस्थित नसतील, इतकंच काय एखादी विकेट घेतल्यानंतर खेळाडूंना एकमेकांची गळाभेटही घेता येणार नाही. आठवड्यातून दोन वेळा खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, शिवाय हॉटेलबाहेर खेळाडूंना जाता येणार नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

हा सामना केवळ क्रिकेटमधील रेकॉर्डमुळेच नव्हे तर त्याव्यतिरिक्त सर्व नियमांमुळेही हा सामना इतिहासात नोंदवला जाईल. विनाप्रेक्षक सामना, कोरोनाची सातत्याने चाचणी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम अशा सर्व नियमांमुळे भविष्यातील क्रिकेटचे सामने कसे असू शकतात, याबाबतची ही झलक असू शकते.

टॉसवेळी ना कॅमेरा, ना शेकहॅण्ड या सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर हे मॅच रेफरी क्रिस ब्रॉडसोबत मैदानात उतरतील. यावेळी ना कॅमेरा असेल, ना कोणी एकमेकाला हस्तांदोलन करु शकतील. अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबोरो हे बॉल घेऊन जातील. मॅचमध्ये सॅनिटायझेशन ब्रेक असेल.

बॉल बॉय नसेल खेळाडू आपली पाण्याची बाटली, बॅग, स्वेटर, शर्ट किंवा टॉवेल एकमेकांना देऊ शकणार नाहीत. कोणीही बॉलबॉय नसेल. ग्राऊंड स्टाफ मैदानावर खेळाडूंच्या 20 मिटर क्षेत्रात जाऊ शकणार नाहीत.

टीम शिट्स डिजीटल असतील. स्कोरर पेन आणि पेन्सिल एकमेकांना देऊ शकणार नाहीत. ICC ने यापूर्वीच चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. जर दोनवेळा उल्लंघन केलं तर विरोधी संघाला पाच धावा दिल्या जातील.

जर षटकार मारल्यानंतर बॉल स्टँडमध्ये गेल्यास, केवळ ग्लोव्ज घातलेले गार्ड्सच तो चेंडू परत मैदानात देतील. अन्य कोणी या चेंडूला स्पर्श करु शकत नाही.

15 मार्चपासून क्रिकेट मैदान ठप्प

कोरोना संकटामुळे 15 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना होऊ शकलेला नाही. आता इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यान कसोटी सामन्याने पुन्हा मैदानात खेळाडू उतरणार आहेत. याआधी शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे सामना सिडनी इथे झाला होता.

(Eng vs WI first test)

संबंधित बातम्या 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.