IND VS ENG : इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार

जर भारताने हा सामना जिंकला किंवा तो अनिर्णित ठेवला तर 15 वर्षानंतर इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात तो यशस्वी ठरेल. भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती.

IND VS ENG : इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार
इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 9:26 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा तिसरा दिवस सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ (England Team) 284 धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलला पहिल्याच षटकात जेम्स अँडरसनने बाद केले. त्याने 3 चेंडूत 4 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी क्रीजवर आहेत. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया (Team India)ची आघाडी 150+ झाली आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 106 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट (Wicket) घेतल्या.

बेअरस्टोचे 11 वे शतक, शमीने केले आऊट

इंग्लंडकडून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या जॉनी बेअरस्टोने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावले. त्याने 140 चेंडूंत 106 धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. बेअरस्टोला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्याचा झेल विराट कोहलीने टिपला. बेअरस्टोचे कसोटी क्रिकेटमधील हे सलग तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 136 आणि 162 धावा केल्या होत्या. 2022 मध्ये या इंग्लंडच्या फलंदाजाने 5 शतके झळकावली आहेत.

हे सुद्धा वाचा

शार्दुल ठाकूरला मोठे यश

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला शार्दुल ठाकूरने बाद केले. स्टोक्सला शार्दुलचा चेंडू मिडऑफ सीमापार पाठवायचा होता, पण जसप्रीत बुमराहने त्याचा शानदार झेल घेतला. स्टोक्सने 36 चेंडूत 25 धावा केल्या. याआधी शार्दुल ठाकूरनेही मोहम्मद शमीच्या चेंडूवर स्टोक्सचा सोपा झेल सोडला होता.

विराट बेअरस्टोची झुंज

इंग्लंडच्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वादावादी झाली. कोहली स्लिपमध्ये उभा राहून बेअरस्टोला स्लेज करत होता. दरम्यान, बेअरस्टो संतापला आणि त्याने विराटवर ओरडण्यास सुरुवात केली. कोहलीनेही इंग्लंडच्या फलंदाजाला प्रत्युत्तर दिले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्या डावात 400+ धावा करण्याची भारताची ही 17 वी वेळ

बर्मिंगहॅम मैदानावर पहिल्या डावात 400+ धावा करण्याची भारताची ही 17 वी वेळ आहे. इतक्या धावा करून आजपर्यंत एकही संघ हरलेला नाही. यापूर्वी, 16 पैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला होता तर 8 सामने अनिर्णित राहिले होते. जर भारताने हा सामना जिंकला किंवा तो अनिर्णित ठेवला तर 15 वर्षानंतर इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात तो यशस्वी ठरेल. भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती. (England were bowled out for 284 in the third Edgbaston Test)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.