Jonny Bairstow : विराट कोहलीशी वादानंतर जॉनी बेअरस्टोने ठोकले शतक, अवघ्या 119 चेंडूत 106 धावा

जॉनीने सुरुवातीच्या 60 चेंडूंमध्ये केवळ 13 धावा केल्या, मात्र त्यानंतरच्या 53 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या. यादरम्यान जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 150 च्या वर होता. विराट कोहलीसोबतच्या वादानंतर जॉनी अधिक अॅक्टिव्ह झाला.

Jonny Bairstow : विराट कोहलीशी वादानंतर जॉनी बेअरस्टोने ठोकले शतक, अवघ्या 119 चेंडूत 106 धावा
विराट कोहलीशी वादानंतर जॉनी बेअरस्टोने ठोकले शतकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:23 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test)त जॉनी बेअरस्टो (Johnny Bairstow)ने तिसरे शतक (Century) झळकावले आहे. भारताच्या ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर जॉनी बेअरस्टोने इंग्लंडसाठी झंझावाती शतक झळकावले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पुनरागमन केले आणि जॉनी बेअरस्टोच्या काउंटर अटॅकने संघाला मजबूत स्थितीत आणले. जॉनी बेअरस्टोचे गेल्या तीन सामन्यांतील हे सलग तिसरे शतक आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने अवघ्या 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकापर्यंत त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार मारले. जॉनी बेअरस्टो सुरुवातीला खूप संघर्ष करत होता, पण नंतर त्याने गियर बदलला आणि तुफानी फलंदाजी सुरू केली.

जॉनी बेअरस्टोने आपल्या डावात एकूण 106 धावा केल्या. त्याला मोहम्मद शमीने बाद केले आणि विशेष म्हणजे विराट कोहलीनेही त्याचा झेल टिपला. इंग्लंडच्या डावाच्या 55व्या षटकात जॉनी बेअरस्टोची विकेट पडली, यावेळी इंग्लंडची धावसंख्या 241-7 होती.

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोमध्ये वाद

सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वादावादी झाली होती. जॉनी बेअरस्टोकडून एक बॉल बीट झाला होता, त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली काहीतरी बोलला. यावर जॉनी बेअरस्टोने प्रत्युत्तर देताच विराट कोहली त्याच्या दिशेने सरसावला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी काय करायचे ते मला सांगू नकोस, तोंड बंद करून बॅट कर, असे कोहली बेअरस्टोला म्हणाला. पण ही लढत त्याच्यासाठी चांगली ठरली, कारण बेअरस्टो सुरुवातीला खूप संघर्ष करत होता. विराट कोहलीसोबतच्या लढतीनंतर त्याचा दृष्टिकोन बदलला.

हे सुद्धा वाचा

या आकडेवारीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की जॉनीने सुरुवातीच्या 60 चेंडूंमध्ये केवळ 13 धावा केल्या, मात्र त्यानंतरच्या 53 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या. यादरम्यान जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 150 च्या वर होता. विराट कोहलीसोबतच्या वादानंतर जॉनी अधिक अॅक्टिव्ह झाला.

जॉनी बेअरस्टोने विक्रम केले

या इनिंगमध्ये जॉनीने काही विक्रम आपल्या नावावर केले. बेअरस्टोने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, 2016 नंतर भारताविरुद्ध इतके जलद केलेले हे पहिले शतक आहे. तसेच, जॉनी बेअरस्टोचे हे गेल्या तीन कसोटीतील सलग तिसरे शतक आहे. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. जॉनी बेअरस्टोने गेल्या तीन सामन्यांमध्ये 8, 136, 162, 71* आणि 100* धावा केल्या आहेत. या खेळीसह जॉनी बेअरस्टो 2022 साली कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. जॉनी बेअरस्टोने या वर्षात आतापर्यंत 5 शतकांसह 880 धावा केल्या आहेत. (Englands Johnny Bairstow completed the century after a dispute with Virat Kohli)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.