Suryakumar Yadav : सुर्यकुमारला रोकण्यासाठी इंग्लंडची स्पेशल मिटिंग, 6 दिग्गजांनी तयार केला प्लॅन
इंग्लंडचा कर्णधार म्हणतो की, त्याची बॅटिंग पाहताना अधिक मजा येते. परंतु आम्ही त्याला बाद करण्यात यशस्वी होईल.
एडलेड : सेमीफायनल मधला पहिला मुकाबला सध्या पाकिस्तान (PAK) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात सुरु आहे. आजच्या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती टीम अंतिम सामना खेळेल. तसेच सेमीफायनलमधला दुसरा मुकाबला टीम इंडिया (IND) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू सद्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे इंग्लंड टीमसमोर त्यांना बाद करण्याचं मोठं आवाहन आहे.
टीम इंडियातील केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या हे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या टीमला उद्याची मॅच म्हणजे एक अवघड परीक्षा आहे. सुर्यकुमार यादव या फलंदाजाला अद्याप कोणी रोखू शकलेलं नाही. विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून सुर्यकुमार यादवने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली आहे.
सुर्यकुमार यादवला रोकण्यासाठी इंग्लंडच्या टीमची स्पेशल मीटिंग झाली आहे. यादवला आऊट करण्यासाठी सहा दिग्गजांनी प्लॅन तयार केला आहे. त्या मिटिंगमध्ये इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर, मैथ्यू मॉट, कार्ल होपकिंसन, माइकल हसी, डेविड सेकर आणि बेन स्टोक्स इत्यादी दिग्गजांची हजेरी होती.
इंग्लंडचा कर्णधार म्हणतो की, त्याची बॅटिंग पाहताना अधिक मजा येते. परंतु आम्ही त्याला बाद करण्यात यशस्वी होईल.
भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड संघ जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .