ENGW vs SAW: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी डॅनियले व्याटला आला धक्कादायक अनुभव, थरार सांगताना अंगावर आला काटा

आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक घटना इंग्लंडची खेळाडून डॅनियले व्याट हिनं सांगितली आहे

ENGW vs SAW: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी डॅनियले व्याटला आला धक्कादायक अनुभव, थरार सांगताना अंगावर आला काटा
ENGW vs SAW: "आज आमचा संपूर्ण संघ..", इंग्लंड वुमन्स टीमच्या डॅनियले व्याटनं सांगितली 'ती' धक्कादायक घटनाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 5:50 PM

मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाची लढत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी एक धक्कादायक घटना इंग्लंडची खेळाडून डॅनियले व्याट हिनं सांगितली आहे.टी 20 वर्ल्डकपसाठी इंग्लंड वुमन्स संघ दक्षिण आफ्रिकेत आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केपटाऊनमधील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेला होता. तेथे रोपवेचा आनंद लुटण्यासाठी बोगीत बसले. पण बोगी डोंगराळ भागात मध्यावर असताना अचानक बंद पडली आणि अडकली. लोड शेडिंगमुळे असा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. इंग्लंडची डॅनियले व्याटनं हिने धक्कादायक अनुभव नुकताच शेअर केला आहे. “बोगीत बसण्यापूर्वी त्यात काही तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे त्यात बसण्यापूर्वीच मला भीती वाटत होती. मात्र बसलो आणि थोड्या अंतरावर जाताच रोपवे बंद पडला. आमची बोगी मधल्या मधेच अडकली. हा अनुभव पाहता पुन्हा तिथे जाईल असं वाटत नाही.”, असं डॅनियले व्याट हिने सांगितलं.

“मी रोपवेनं यापुढे कधीच जाणार नाही. हा संपूर्ण प्रकार लोड शेडिंगमुळे घडला होता. त्यामुळे पुढच्या वेळेस मी पायऱ्यांनी जाणं पसंत करेन.”, असंही डॅनियले व्याट हिने सांगितलं. “जे घडले त्यात आमची काही चूक नाही.आम्ही तिथे अडकलेल्या प्रवाशांच्या अनुभवाबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो. सर्व प्रवासी सुरक्षितपणे वरच्या आणि खालच्या ठिकाणी पोहोचले. याचा आम्हाला आनंद होत आहे,” व्यवस्थापकीय संचालक वहिदा पारकर यांनी सांगितले.

दुसरीकडे, वुमन्स प्रिमियर लीगमध्ये अनसोल्ड राहिल्याने डॅनियले व्याटनं दु:ख व्यक्त केलं आहे. 13 फेब्रुवारीला लिलावात जे काही घडलं त्याबाबत मन दुखावलं. “मी हॉटेलमध्ये गेली आणि रुममध्येच होती. तेव्हा खरंच माझं मन दुखावलं होतं.तेव्हा आमच्या संघातील काही मुली तिथे होत्या. त्यांना अपेक्षित होतं ते मिळालं. पण काही जणींना मिळालं नाही.”,असं डॅनियले व्याटनं सांगितलं.

डॅनियले व्याटची क्रिकेट कारकिर्द

डॅनियले व्याटनं 102 वनडे सामने खेळली आहे. यापैकी तिला 88 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात दोन शतकं आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 1776 धावा केल्या. तर 142 टी 20 सामने खेलत दोन शतकं आणि 11 अर्धशतकांच्या जोरावर 2335 धावा केल्या. तर गोलंदाजीत वनडेत 27 गडी, तर टी 20 त 46 विकेट्स घेतल्या आहेत.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.