मुंबई पलटण आणि फॅन्सना चिअर करणार ‘युफोनी बँड’चं नवं गाणं
'युफोनी ऑफिशियल' हा युवा संगीतकार आणि कलाकारांचा बँड त्यांच्या आवडीच्या टीम मुंबई इंडियन्ससाठी गाणार आहे.
मुंबई : ‘युफोनी ऑफिशियल’ (Euphony Official) या म्युझिक बँडची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. युवा संगीतकार आणि कलाकारांचा हा बँड त्यांच्या आवडीच्या टीम मुंबई इंडियन्ससाठी गाणार आहे. आयपीएलचा फीवर संपूर्ण भारतभर असल्याने आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना यंदाही त्यांच्या टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच रोहित शर्माच्या मुंबई पलटणला चिअर करण्यासाठी युफोनी ऑफिशियलने येक गाणं तयार केलं आहे. हे गाणं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास हा ग्रुपत उत्सुक असल्याचं दिसत आहे. (Euphony Official, welcomes team Mumbai Indians with new song)
युफोनी ऑफिशियलबाबत सांगायचे झाल्यास, हा बँडभारतभर त्यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहे. या बँडमधील संगीतकार तरुण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते, तेव्हाच त्यांनी या ग्रुपची आणि बँडची स्थापना केली होती. महाविद्यालयांमध्ये असताना त्यांनी विविध स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा गाजवल्या आणि त्यानंतर एक बँड म्हणून काम करण्यचा विचार केला.
एक उदयोन्मुख बॅण्ड असल्याने आणि त्याचवेळी मुंबई इंडियन्सचे अस्सल समर्थक म्हणून आम्ही आमच्या आवडत्या टीमला चिअर करण्यासाठी एक गाणं तयार केलं आहे, आशा भावना बँडचे सदस्य रूपेश शिरसाट यांनी व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे हे थीम साँग बँडनेच लिहिलं आहे आणि संगीतबद्धदेखील केले आहे. आता हे गाणं प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. हे गाणं लवकरच प्रदर्शित केलं जाईल, अस बँडकडून सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
मुंबईची घोडदौड सुरु
मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकातावर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकाता विरुद्धचा विजय मुंबईचा या मोसमातील पहिला विजय ठरला. मुंबईने कोलकाताला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 142 धावाच करता आल्या. कोलकाताची 14.5 ओव्हरनंतर 3 बाद 122 अशी स्थिती होती. कोलकाताला विजयासाठी 31 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या 7 फलंदाजांना बाद केलं. यासह मुंबईने या मोसमातील पहिला विजय साकारला.
संबंधित बातम्या :
रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?
IPL 2021 | अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिट्ल्सच्या आणखी एका स्टार खेळाडूला कोरोनाची लागण
Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान
(Euphony Official, welcomes team Mumbai Indians with new song)