IND vs SA 2nd t20 : टीम इंडियाच्या विजयानंतरही कॅप्टन रोहित या खेळाडूंवर भडकला
काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची दुसरी मॅच झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियाची अधिक धावसंख्या उभारली.
आशिया चषकात (Asia Cup) खराब गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंवरती टीम व्यवस्थापनाला दोष द्यायला सुरुवात केली होती. कारण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना घरी का बसवलं आहे. त्याचबरोबर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कोणी घेतलं आहे अशी टीका सोशल मीडियावर (Social Media) झाली होती.
आशिया चषकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. कारण पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात महत्त्वाची ज्यावेळी मॅच झाली त्यावेळी गोलंदाजांनी अधिक खराब कामगिरी केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अधिक चांगली कामगिरी केली नाही. पण टीम इंडियाची फलंदाजी अंतिम सामन्यात चांगली झाल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली.
काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची दुसरी मॅच झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियाची अधिक धावसंख्या उभारली. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी काल चांगली फलंदाजी केली. त्यामुळे ते सुद्धा विजयाच्या जवळ आले होते.
कालच्या सामन्यात गोलंदाजांची पुन्हा खराब कामगिरी केली. कारण अंतिम षटकामध्ये गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक धावा जात आहेत, त्यामुळे गोलंदाजांनी त्यांच्या चुका सुधारायला हव्यात. वारंवार सांगूनही चुका होत असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं आहे.