मी 19 वर्षांचा असताना शुबमनच्या 10 टक्केही नव्हतो : विराट कोहली
वेलिंग्टन : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 3-0 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. उर्वरित दोन सामने केवळ औपचारिकताच उरले आहेत. त्यामुळे या दोन सामन्यांमध्ये भारत आता राखीव खेळाडूंचा वापर करणार आहे. चौथ्या सामन्यातून युवा फलंदाज शुबमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार असल्याचे संकेत खुद्द विराट कोहलीने दिले आहेत. तिसरा वन डे […]
वेलिंग्टन : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 3-0 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. उर्वरित दोन सामने केवळ औपचारिकताच उरले आहेत. त्यामुळे या दोन सामन्यांमध्ये भारत आता राखीव खेळाडूंचा वापर करणार आहे. चौथ्या सामन्यातून युवा फलंदाज शुबमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार असल्याचे संकेत खुद्द विराट कोहलीने दिले आहेत.
तिसरा वन डे सामना जिंकल्यानंतर बोलताना विराट कोहली कोहलीने शुबमनचं कौतुक केलं. आम्ही आतापर्यंतचे सामने एकतर्फी जिंकलेत. पुढचे दोन सामनेही असेच जिंकण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही विजय मिळवल्यामुळे चांगलं वाटतंय. आता मी माझ्या सुट्ट्या निश्चिंतपणे एंजॉय करु शकतो, असं विराट म्हणाला.
विराट कोहली उर्वरित दोन सामन्यांसाठी उपस्थित नसेल. त्यामुळे शुबमनच्या पर्यायावरही त्याने भाष्य केलं. कधी ना कधी कुणी तरी आपली जागा घेतंच, खेळात असंच चालतं. शुबमन हा उत्कष्ट खेळाडू आहे. त्याला नेट्सवर खेळताना मी पाहिलंय आणि त्याच्या फलंदाजीने मी प्रभावित झालोय. मी 19 वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या 10 टक्केही फलंदाजी करत नव्हतो, असं विराट म्हणाला.
कोण आहे शुबमन गिल?
शुबमन गिल हा उदयोन्मुख फलंदाज आहे. विराट कोहलीप्रमाणेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. त्यामुळे भारतीय संघातही त्याला विराटच्या अनुपस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंडमध्ये शुबमनचं रेकॉर्ड चांगलं आहे. ज्या अंडर 19 विश्वचषकातून शुबमनचं भाग्य चमकलं होतं, तो विश्वचषक न्यूझीलंडमध्येच खेळवण्यात आला होता. मालिकावीराचा मान त्याला मिळाला होता.