जाडेजा-धोनीच्या फटकेबाजीवर टाळ्या, मॅच हरताच फॅनचा धक्क्याने मृत्यू
भारतात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी जीव की प्राण आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला.
पाटणा : भारतात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी जीव की प्राण आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आणि संपूर्ण देश अक्षरश: हळहळला. भारताच्या या पराभवाच्या धक्क्याने एका क्रिकेट फॅनचा मृत्यू झाला. टीम इंडियाच्या पराभवानंतर बिहारच्या पाटण्यातील अशोक पासवान यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पासवान हे मृत्यूपूर्वी भारत वि न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटत होते. रवींद्र जाडेज आणि महेंद्रसिंह धोनीच्या प्रत्येक फटक्यावर टाळ्या वाजवत होते. मात्र जाडेजा आऊट झाल्यानंतर अशोक पासवान हिरमूसले.
जाडेजानंतर धोनीही बाद झाला आणि भारताने सामना गमावला. त्यामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. त्याचदरम्यान अशोक पासवान यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
भारताचा 18 धावांनी पराभव
महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच या विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवासही इथेच संपला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (दुसरा सेमीफायनल) विजेत्या संघासोबत न्यूझीलंडची फायनलमध्ये लढत रंगणार आहे. न्यूझीलंडच्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली. जाडेजाने 77 तर धोनीने 50 धावा केल्या.
संबंधित बातम्या
जाडेजा-धोनीची झुंज अपयशी, सेमीफायनलमध्ये भारताचा 18 धावांनी पराभव
शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल
जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर धावबाद, 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा मावळल्या