आयपीएल ट्रॉफी मुंबईने जिंकली, पण मैदानात फक्त ‘धोनी, धोनी’
हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याच नावाची गर्जना मैदानात ऐकायला मिळाली. धोनी जेव्हा उपविजेता […]
हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याच नावाची गर्जना मैदानात ऐकायला मिळाली. धोनी जेव्हा उपविजेता म्हणून बक्षीस घेण्यासाठी आला तेव्हा चाहत्यांनी धोनी, धोनीच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडलं.
धोनी केवळ दोन धावांवरच धावबाद झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती आणि पंचांच्या निर्णयावर चाहते खुश नव्हते. धोनीने खेळण्यासाठी मैदानात एंट्री करताच त्याच्या नावाच्या घोषणांनी मैदान दणाणून गेलं. पण पराभवानंतरही धोनीच्या नावाची गर्जना सुरु दिसली. धोनी उपविजेत्या संघाचं बक्षीस घेण्यासाठी आला तेव्हा चेन्नईच्या चाहत्यांनी धोनी, धोनीच्या घोषणा दिल्या.
धोनीने या आयपीएलमध्ये चेन्नईच्या खेळाडूंवर समाधान व्यक्त केलं. मधली फळी कमकुवत असल्याचंही तो म्हणाला. पण आम्ही आणि मुंबई एकमेकांकडे ट्रॉफी पास करत असतो, असंही तो मिश्कील शैलीत म्हणाला. पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्येही खेळेन, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय आता सर्व फोकस विश्वचषकावर करणार असल्याचं सांगितलं. या आयपीएलमध्ये धोनीला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. पण लगेच फिट होत त्याने चेन्नईला फायनलपर्यंत आणलं.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक
धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरलाय. मुंबईचा फलंदाज क्विंटन डी कॉकचा झेल पकडताच त्याने हा विक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 132 फलंदाजांना माघारी धाडलंय, ज्यात 94 झेल आणि 38 स्टम्पिंगचा समावेश आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या नावावर होता. कार्तिक सध्या दुसऱ्या क्रमांकावर, तर कोलकात्याचाच रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
VIDEO : धोनीला बाद दिल्यानंतर चाहत्यांचा संताप
#IPL2019Final #MIvCSK @ChennaiIPL #Dhoni Man of the match award gos to Umpire, sponsored by Reliance jio!! pic.twitter.com/nFoOWmWlNH
— Ganesh (@Ganesh953333) May 12, 2019