FC Bayern Maharashtra Cup : क्रीडा प्रबोधिनी फायनलमध्ये, उपांत्य फेरीत कोल्हापूरचा 1-0 ने पराभव

FC Bayern Maharashtra Cup : क्रीडा प्रबोधिनीने उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी असा सामना रंगणार आहे.

FC Bayern Maharashtra Cup : क्रीडा प्रबोधिनी फायनलमध्ये, उपांत्य फेरीत कोल्हापूरचा 1-0 ने पराभव
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 6:42 PM

मुंबई : एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणे विरुद्ध मुंबई अशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी या संघाने कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलचा 1-0 गोलने धुव्वा उडवला.या विजयासह क्रीडा प्रबोधिनीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत मुंबई विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी हा सामना रंगणार आहे. क्रीडा प्रबोधिनीकडून युग झिंजेनं पहिल्या सत्रात गोल झळकावला. या गोलची आघाडी संघानं शेवटपर्यंत ठेवली. तसेच कोल्हापूरच्या संघाला क्रीडा प्रबोधिनीची व्यूहरचना काही भेदता आली नाही. त्यामुळे कोल्हापूरचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. आता अंतिम फेरीचा सामना मुंबई विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी यांच्यात 3 मार्च 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता विद्युत प्रकाश झोतात रंगणार आहे.

उपांत्य फेरीपर्यंतचा दोन्ही संघांचा प्रवास

क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध उस्मान आझाद उर्दु हायस्कूल (अकोला) यांच्यात उपांत्य पूर्व फेरीचा सामना रंगला. या सामन्यात क्रीडा प्रबोधिनीनं अमरावती विभागातील उस्मान आझाद उर्दु हायस्कूलचा 20-0 ने धुव्वा उडवला होता. या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र हायस्कूल (कोल्हापूर) संघाने श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल (लातूरचा) 14-0 ने धुव्वा उडवला होता.

मुंबई विरुद्ध पुणे उपांत्य फेरीची लढत

उपांत्य फेरीचा पहिला सामना नवी मुंबईच्या फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल आणि पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलमध्ये रंगला. या सामन्यात मुंबईने पुण्यावर 2-1 ने विजय मिळवला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल बरोबरी साधण्यासाठी पुण्याच्या टीमने जोरदार प्रयत्न केले. पण मुंबईच्या बचावपटूंनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

क्रीडा प्रबोधिनी- युग झिंजे, वेदप्रकाश पटेल, जयदेव राठोड, ध्रूव गणोरे, यश कांबळे, दानिश अली, राजवीर गुरव, अफराज शेख, अविष्कार, उनावने, स्वराज सावंत, भार्गव शेलोकर, तौहिद अहमद, रुद्राक्ष जैस्वाल, रेहान सय्यद, शौर्यजीत पाटील, केविन गोन्सावलिस, मोहमद झैनुल अबेदिन, आदित्य लेकमी

महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर –प्रतीक पाटील, धनजय जाधव, इशान तिवले, शुभम कांबळे, समर्थ मोरबाळे, श्रेयस निकम, हर्षवर्धन पाटील, सर्वेश गवळी, संस्कार खोत, आयुष शिंदे, प्रथमेश बडगुजर, स्वयम जाधव, स्वरूप सुतार, पृथ्वीराज साळोखे, श्री भोसले, आदित्य पाटील, सोहम पाटील, इशान हिरेमठ, सुयश सावंत,आसिफ मकंदर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.