पुणे : कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र हायस्कूल स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. त्यांनी लातूरच्या श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा धुव्वा उडवला. महाराष्ट्र हायस्कूलने बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा 14-0 गोल फरकाने पराभव केला. लातूरचा संघ पुरता हतबल दिसून आला. कोल्हापूरच्या संघाने लातूरच्या संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. याआधी नाशिकच्या बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टीमने प्री क्वार्टर फायनलमध्ये नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलवर दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेतील 20 खेळाडूंची निवड केली जाणार असून त्यांना एफसी बायर्न क्लबकडून जर्मनीत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलने या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्यांनी लातूरच्या बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलला अजिबात डोकवर काढण्याची संधी दिली नाही. त्यांनी वारंवार बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूललाच्या गोलक्षेत्रात धडक दिली. लाहोटी इंग्लिश स्कूलचा बचाव कमकुवत ठरला. त्यांचे अनेक कच्चे दुवे या सामन्यातून उघड झाले. शेवटच्या क्षणापर्यंत श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल संघ गोल करण्यासाठी झगडत राहिली.
महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर : प्रतीक पाटील, धनजय जाधव, इशान तिवले, शुभम कांबळे, समर्थ मोरबाळे, श्रेयस निकम, हर्षवर्धन पाटील, सर्वेश गवळी, संस्कार खोत, आयुष शिंदे, प्रथमेश बडगुजर, स्वयम जाधव, स्वरूप सुतार, पृथ्वीराज साळोखे, श्री भोसले, आदित्य पाटील, सोहम पाटील, इशान हिरेमठ, सुयश सावंत,आसिफ मकंदर
श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, लातूर : वेदांत सोळंके, ओंकार खंडेलवाल, रितेश कदम, आर्यन काजरे, स्वराज हांडे, श्रेयश सूर्यवंशी, देव बनसुडे, राहित नागटिळक, कुशल मुंदडा, संजोग सोनी, हर्ष शाक्यमुनी, एमडी नोमन घंटे, अबुझर सय्यद, साई शिवणे, श्रीनाश वर्मा, वरद जाधव, अजित माने, श्रीराज तापडीया, विवेकानंद धमाले, अभिजीत देशमुख