IPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज

केएल राहुलसमोर ऑरेंज कॅप राखण्याचे आव्हान आहे. तर मयंकला ऑरेंज कॅपसाठी 1 धावेची गरज आहे.| (Fight Between Lokesh Rahul and Mayank Agarwal For The Orange Cap)

IPL 2020, KXIP vs MI : ऑरेंज कॅपसाठी मयंक अगरवाल-लोकेश राहुलमध्ये कडवी झुंज
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 7:03 PM

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 13 वा सामना आज (1ऑक्टोबर) खेळण्यात येणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्यात पंजाबचे सलामीवीर फंलदाज लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यांच्यात ऑरेंज कॅपसाठी (Orange Cap) कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. केएल राहुलसमोर ऑरेंज कॅप राखण्याचे आव्हान आहे. तर मयंकला ऑरेंज कॅपसाठी 1 धावेची गरज आहे. केएल राहुल सर्वाधिक धावांच्या यादीत पहिल्या क्रमावर आहे. तर त्या खालोखाल मयंक अगरवाल आहे. (Fight Between Lokesh Rahul and Mayank Agarwal For The Orange Cap)

कर्णधार केएल राहुलने यंदाच्या मोसमात 3 सामन्यात 222 धावा केल्या आहेत. यात एका दणदणीत शतकाचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर पंजाबचा मयंक अगरवाल आहे. मयंकच्या नावावर 221 धावांची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आहे. प्लेसिसने 3 सामन्यात 173 धावा केल्या आहेत.

त्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात ऑरेंज कॅपसाठी लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांच्यात काटे की टक्कर असणार आहे. या सामन्यात या दोघांपैकी जो सर्वाधिक धावा करेल, त्याला ऑरेंज कॅपचा बहुमान मिळेल. या दोन्ही खेळाडूंनी मोसमाच्या सुरुवातीपासून धडाकेबाज खेळी केली आहे. त्यामुळे पंजाबच्या समर्थकांना आजही या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

पर्पल कॅप कोणाकडे ?

गोलंदाजांच्या यादीत खगीसो रबाडा (Khagiso Rabada) अग्रस्थानी आहे. रबाडाने 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. पंजाबचा मोहम्मद शमी (Mohmmed Shami) 7 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडाच्या तुलनेत शमीचा बोलिंग एव्हरेज जास्त असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमीला पर्पल कॅपसाठी (Purple Cap) अवघ्या 1 विकेटची गरज आहे.

दिल्ली कॅपिट्लस पहिल्या क्रमांकावर

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. तर राजस्थानला पराभूत केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. राजस्थानची पराभवामुळे तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर तगडा संघ समजला जाणारा चेन्नई सुपर किंग्जस चक्क शेवटच्या म्हणजेत आठव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs MI, Live Score : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

(Fight Between Lokesh Rahul and Mayank Agarwal For The Orange Cap)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.