Maharashtra Kesari : सांगलीत महिला कुस्तीपटूंचे हाल, अंधारातून वाट काढण्याची वेळ

Maharashtra Kesari : पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चुकीच्या कारणांमुळे चर्चेच आहे. महिला कुस्तीपटूंना त्रास सहन करावा लागतोय. ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका या महिला कुस्तीपटूंना बसलाय.

Maharashtra Kesari : सांगलीत महिला कुस्तीपटूंचे हाल, अंधारातून वाट काढण्याची वेळ
Maharashtra kesari
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:03 AM

सांगली : महाराष्ट्रात प्रथमच महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच आयोजन करण्यात आलं आहे. सांगली येथे या स्पर्धा सुरु आहेत. खरंतर महिलांसाठीची ही पहिलीच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा असल्याने भव्य-दिव्य आयोजनाची अपेक्षा होती. पण कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. राज्यातील जवळपास 400 हून अधिक महिला कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.

स्पर्धेच्या आयोजनात अनेक त्रुटी राहिल्याने महिला कुस्तीपटूंचे हाल होत आहेत. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट चालू नाहीय. त्यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावं लागतय.

जेवणासाठी रांगेत उभं राहण्याची वेळ

याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं. क्रीडा संकुलात अत्यंत छोटयाशा मेस मध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे रांगेत ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं.

रहायची व्यवस्था कशी आहे?

आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपटूना खाली बसून जेवण करावे लागले. पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. महिलांची राहण्याची व्यवस्था देखील नीट नसल्याच्या तक्रार करण्यात येत होत्या.

महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. मात्र यामध्ये नियोजनाचा मोठा अभाव होता. ज्यामुळे महिला कुस्तीपट्टूची मोठी गैरसोय झाली आहे.

दिपाली सय्यद भोसले यांच्या वक्तव्यावरुन वादंग दरम्यान मागच्या आठवड्यात दिपाली सय्यद भोसले यांच्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता राजकारणात सक्रीय असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीचं शासनाची अधिकृत स्पर्धा असल्याच म्हटलं होतं. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. भारतीय कुस्ती परिषदेच्या अस्थाई समितीने एक ते सात एप्रिल दरम्यान पुण्यात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असल्याची घोषणा केलीय. सांगलीतही स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे खरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठली असा प्रश्न पडला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.