मुंबईकरांचा दबदबा, न्यूझीलंड दौऱ्यासाठी 5 मुंबईकर भारतीय संघात
न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंडमध्ये भारत 3 वन डे, 5 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
India vs New Zealand मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंडमध्ये भारत 3 वन डे, 5 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान वन डे मालिकेसाठी 16 सदस्यांच्या संघात 5 खेळाडू हे मुंबईचे आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मासह अन्य चार मुंबईकरांना टीम इंडियात स्थान मिळालं आहे. (India vs New Zealand)
न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. यासाठी 5 मुंबईकरांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये रोहित शर्मा, युवा सलामीवीर पृथ्वी शॉ, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू शिवम दुबे आणि मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू मुंबईकडून खेळतात.
मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी ही अभिमानाची बाब आहे. कारण देशभरातून निवडल्या जाणाऱ्या 16 खेळाडूंपैकी पाच खेळाडू मुंबईचे आहेत. त्यामुळे कोणत्याही क्रिकेट संघटनेसाठी ही अभिमानाचीच बाब असावी. मुंबईशिवाय दिल्लीचे 3 खेळाडू भारतीय संघात आहेत. यामध्ये कर्णधार विराट कोहली, विकेटकीपर ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे.
दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूजीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या सलामीवीर फलंदाज शिखर धवनला या दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी वन डे मालिकेसाठी पृथ्वी शॉ तर टी 20 साठी यष्टीरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलं आहे.
टी-20 : भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर.
एकदिवसीय सामने : भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केदार जाधव.
न्यूजीलंड दौरा : टी-20 वेळापत्रक
1. पहिला टी-20 सामना : ऑकलँड – 24 जानेवारी
2. दुसरा टी-20 सामना : ऑकलँड – 26 जानेवारी
3. तिसरा टी-20 सामना : हॅमिल्टन – 29 जानेवारी
4. चौथा टी-20 सामना : वेलिंग्टन – 31 जानेवारी
5. पाचवा टी-20 सामना : माऊंट माउंगानुई – 2 फेब्रुवारी
न्यूजीलंड दौरा : एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
1. पहिला वनडे सामना : हॅमिल्टन – 5 फेब्रुवारी
2. दुसरा वनडे सामना : ऑकलँड – 8 फेब्रुवारी
3. तिसरा वनडे सामना : माऊंट माउंगानुई – 11 फेब्रुवारी
न्यूजीलंड दौरा : कसोटी सामने वेळापत्रक
1. पहिला कसोटी सामना : वेलिंग्टन – 21 ते 25 फेब्रुवारी
2. दुसरा कसोटी सामना : क्राइस्टचर्च – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च
संबंधित बातम्या
न्यूझीलंड दौऱ्यासाठी संजू सॅमसन; पृथ्वी शॉला संधी, धडाकेबाज सलामीवीर बाहेर