त्यानं 52 शतकं लगावली, रिपोर्टरही झाला, नाबाद ट्रिपल सेंच्युरी, त्याच्यासोबत क्रिकेट पंढरीच्या पिचवर जे घडलं, त्यानं जग स्तब्ध झालं
अँड्र्यु डुकैट (Andy Ducat) असं नाव जरी वाचलं तर क्रिकेटच्या इतिहासतला सर्वात वेदनादायी प्रसंग आठवतो.
मुंबई : अँड्र्यु डुकैट (Andy Ducat Birthday Special) असं नाव जरी वाचलं, तर क्रिकेटच्या इतिहासतला सर्वात वेदनादायी प्रसंग आठवतो. 134 वर्षांपूर्वी त्याच डुकैटचा आजच जन्म झाला होता. डुकैट हे त्या मोजक्या खेळाडूंपैकी आहेत ज्यांनी फुटबॉल आणि क्रिकेट अशा दोन्ही खेळात झेंडा फडकवला. डुकैटची कारकिर्द फार मोठी नाही (Andy Ducat Birthday Special).
अल्पावधीतच तिला पूर्णविराम लागला. पण त्यानं मिळवलेलं यश हे अजुनही तळपतं आहे. डुकैट सरे क्लबकडून क्रिकेट खेळले तर आर्सेनलकडून फुटबॉल. पण क्रिकेटच्या मैदानात त्याच्यासोबत जे घडलं त्यानं जग स्तब्ध झालं. ती घटना अजुनही लोक पिढ्यानपिढ्या सांगत असतात.
डुकैटची क्रिकेट कारकिर्द कशी होती?
इंग्लंडच्या (England) अँड्र्यु डुकैटचा जन्म 16 फेब्रुवारी 1896 साली दक्षिण इंग्लंडच्या ब्रिक्सटॉनमध्ये झाला होता. डुकैट इंग्लंडसाठी फक्त एक टेस्ट मॅच खेळले. यात ते फक्त 5 रन्स काढू शकले. यानंतर डुकैट कधीही क्रिकेट खेळू शकले नाहीत. ही टेस्ट मॅच 1921 साली ऑस्ट्रेलियाच्याविरोधात खेळली होती. पण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डुकैटची कामगिरी भारी होती. 429 मॅचमध्ये 23 हजार 373 रन्स काढल्या होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट होता 38.31. डुकैटनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक नाही दोन नाही तर 52 शतकं लगावली. 102 अर्धशतकंही डुकैटच्या नावावर आहेत. यात एकदा ते ट्रिपल सेंच्युरी मारुन नाबाद राहीले होते.
डुकैटची ती चटका लावणारी ग्राऊंडमधली एक्झिट
1931 मध्ये डुकैटनी क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे एटन कॉलेजचे क्रिकेट कोच म्हणून काम केलं. डेली स्कॅचसाठी डुकैटनं रिपोर्टरचेही काम केलं. त्यानंतर काही दिवसातच एका घटनेत त्यांचं निधन झालं तेही क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर. ते युद्धाचे दिवस होते. लॉर्डसवर वॉरटाईम मॅच सुरु होता. डुकैटही त्या सामन्यात खेळत होते. बॅटींग करतात करता डुकैट पिचवरच कोसळले. त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यातच त्यांचा जीव गेला. लॉर्डसच्या पिचवर ह्या महान खेळाडूसोबत ही घटना घडली. त्यावेळेस डुकैट हे 56 वर्षाचे होते (Andy Ducat Birthday Special).
1000 पेक्षा अधिक विकेट्स, एका डावात 10 बळी, चायनामॅन बोलचा अविष्कार करणाऱ्या अवलियाचा जन्मदिनhttps://t.co/dTTkhW0yCQ
| #ellisachong | #WestIndies | #Cricket | #Chinaman |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
Andy Ducat Birthday Special
संबंधित बातम्या :
आधी लाजिरवाणा पराभव, 10 चेंडूत 5 सिक्स खेचणारा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, स्फोटक खेळाडूचं कमबॅक
इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप