कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर आज (2 जानेवारी) संध्याकाळी अॅंजियोप्लास्टी करण्यात येणार आहे. गांगुलीला (Sourav Ganguly) ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. (Former cricketer and BCCI president Sourav Ganguly will undergo angioplasty)
गांगुलीवर अँजियोप्लास्टी करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. डॉक्टर सरोज मंडल यांच्या नेतृत्वात एकूण 4 डॉक्टर गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.
गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. वीरेंद्र सेहवाग, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटद्वारे गांगुलीच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
जय शाह यांनी केलेलं ट्विट
I wish and pray for the speedy recovery of @SGanguly99. I’ve spoken to his family. Dada is stable and is responding well to the treatment.
— Jay Shah (@JayShah) January 2, 2021
जल्दी ठीक होने का
Dada , jaldi se theek hone ka.
Praying for your quick and speedy recovery @SGanguly99 .— Virender Sehwag (@virendersehwag) January 2, 2021
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
मुख्मंत्री ममता बॅनर्जी यांच ट्विट
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
वुडलॅंड्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात आलं. गांगुलीला आम्ही आवश्यक ते डोस दिले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली बासु यांनी दिली.
गांगुली गेल्या काही महिन्यांपासून कोलकातामध्येच आहे. गांगुलीने काही दिवसांआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. यानंतर गांगुलीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपशी वाढती जवळीक पाहून मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीला दिलेला भूखंड परत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गांगुलीला सौम्य झटका आला का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या :
सौरव गांगुलीच्या हार्ट अटॅकचं राजकीय कनेक्शन?
Sourav Ganguly | क्रिकेटर सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका
(Former cricketer and BCCI president Sourav Ganguly will undergo angioplasty)