Vinod Kambli Wife : सचिनने पाठवले मुलांच्या फीचे पैसे, मी ते… विनोद कांबळीच्या पत्नीने अखेर सोडलं मौन
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरच्या वागमुकीबद्दलही ती बोलली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका सोहळ्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही सहभागी झाले होते. मात्र विनोदची अवस्था पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर तब्येत बिघडल्यामुळे विनोद कांबळीला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला, मात्र सध्या तो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची तब्येत, त्याचं व्यसन, काम न मिळणं, आर्थिक परिस्थिती या सगळ्या विषयांवर बोलत विविध तर्क लावले जातात.अनेकदा विनोदने यावर स्पष्टीकरणही दिले आहे, मात्र लोकांच काय.. ते 10 तोंडानी बोलतच असतात. याच सगळ्या चर्चांच्या दरम्यान आता विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाने तिचे मौन सोडलं असून त्यांच्या वैयक्तिक, खासगी आयुष्याबद्दल तिने अनेक खुलासे केल आहेत. त्यांच लग्न, आर्थकि समस्या आणि कांबळीच्या मद्यपानाच्या व्यसनामुळे त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याचा खुलासा अँड्रियाने एका मुलाखतीत केला आहे.
अँड्रिया ही एक यशस्वी मॉडेल होती, 2004 मध्ये तिची विनोद कांबळीशी पहिली भेट झाली. ‘ त्यावेळी आईच्या निधनामुळे विनोद मानसिकरित्या डिस्टर्ब होता आणि त्यामुळे त्याला दारूचे व्यसन होते. मला वाटलं तो इमोशनली त्रासलाय त्यामुळे तो दारू पितोय. काही काळाने त्याने मला लग्नाबाबत विचारलं, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला दारू सोडावी लागेल,’ असं अँड्रिया म्हणाली.
विनोद कांबळी आणि अँड्रियाने 2006 मध्ये लग्न केले, पण सुरुवातीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट होती. लग्नापूर्वी विनोद कोणत्यातरी महिलेसोबत फिरत असे. सचिन तेंडुलकरला ती महिला फारशी आवडली नाही. त्याने विनोदला अँड्रियाशी लग्न करण्याचा सल्लाही दिला.
दारूच्या व्यसनाचा त्रास
2010 साली जेव्हा त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म होणार होता, तेव्हा आर्थिक समस्यांमुळे कांबळी खूप चिंताग्रस्त झाला होता. अँड्रियाने कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि अनेक कॉन्ट्रॅक्टस साईन केली. त्यानंतर कांबळीची प्रकृती सुधारू लागली. अँड्रियाने त्याला दारू सोडण्यास प्रोत्साहन दिलं. 6 वर्ष विनोदने दारूला हातही लावला नाही, पण तो सिगारेट मात्र ओढायचा. त्याच्या प्रकृतीत ही सुधारणा पाहून सचिनलाही आश्चर्य वाटले. मात्र, कालांतराने तो (विनोद) पुन्हा दारूच्या आहारी गेला.
2014 मध्ये त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर कांबळीला दारूच्या व्यसनामुळे पुनर्वसन केंद्रात (रीहॅब) पाठवण्यात आले होते, असेही अँड्रियाने सांगितले. ‘ आत्तापर्यंत तो 6-7 वेळा रिहॅबमध्ये गेला आहे. कोविड-19 दरम्यान काम बंद पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. 2023 मध्ये, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची (Psychiatrist) मदत घेतली, कांबळीने औषध तर घेतली पण त्यासोबतच त्याचं दारू पिणंही सुरूच होतं, त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाला’, असं अँड्रियाने नमूद केलं.
सोसायटीमध्ये भोगावा लागला त्रास
अँड्रियाने सांगितलं की, ‘ सच का सामना शोमध्ये कांबळीने सचिनबद्दल काही वक्तव्य केली होती, त्यामुळे गोष्टी आणखी बिघडल्या, नकारात्मक झाल्या. मात्र एक काळ असा होता की सचिनने त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फीचे पैसे पाठवले होते, पण मी ते परत केले’, असं अँड्रियाने नमूद केलं.
‘ आम्ही जिथे राहतो, तिथे विनोदला वारंवार टार्गेट केलं जातं. तिथे आणखीही माजी खेळाडू राहतात. पण सोसायटीत विनाकारण ( आमच्याविरोधात) नोटीस लावली जाते, मुलांना चिडवलं जातं आणि विनोदला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला होता’, असा दावा अँड्रियाने केला. ‘ विनोदला त्याचे भाऊ आवडत नाहीत, दुसरीकडे माझ्या (आंद्रिया) कुटुंबाकडूनही दबाव होता, पण मी माझ्या पतीची साथ कधीच सोडू शकत नाही’ , असं तिने ठामपणे सांगितलं. जेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट होती तेव्हा काही सामाजिक संस्थांनी मदत केल्याचे सांगत परिस्थिती लवकरच सुधारेल अशी आशा तिने व्यक्त केली.