टीम इंडियाचा माजी खेळाडू दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, होणारी पत्नी 28 वर्षांनी लहान
अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. ते बंगालकडून क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू, बंगालचे क्रिकेटपटू आणि इतर कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या लग्नाला आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई – भारताचा माजी सलामीवीर अरुण लाल (Arun Lal) दुस-यांदा लग्न करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव बुलबुल साहा (Bulbul Saha) आहे. बुलबुलचे यांचे वय 38 वर्षे आहे. तर अरुण लाल यांचे वय 66 वर्षे आहे. अरूण लाल यांची होणारी पत्नी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. अरुण आणि बुलबुल हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. दोघेही खूप जुने मित्र आहेत. अरुण लाल यांनी लग्नपत्रिका छापून आणली आहे. सध्या लग्नपत्रिका त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना देण्याचे काम सुरू आहे. अरूल ला यांचा विवाह 2 मे रोजी कोलकाता येथील पीयरलेस इन हॉटेलमध्ये होणार आहे. लग्न झाल्यानंतर उपस्थित नातेवाईकांसाठी त्यांनी मोठ्या रिसेप्शनचं (Reception) आयोजन केलं आहे.
पहिल्या पत्नीच्या अरूण लाल यांचे दुसरे लग्न
अरुण लाल यांनी रीनाशी पहिले लग्न केले होते. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नी रीना या दीर्घकाळापासून आजारी आहेत. अरुण लाल यांचे त्या इच्छेनेच दुसऱ्यांदा लग्न लावून देणार आहेत. अरुण आणि बुलबुलची केवळ महिनाभरापूर्वीच एंगेजमेंट झाली आहे, तर हे दोघांचं नातं बऱ्याच दिवसांपासून आहे असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्करोगावर मात करून बंगाल संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले
अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. ते बंगालकडून क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू, बंगालचे क्रिकेटपटू आणि इतर कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या लग्नाला आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये अरुण लाल यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांनी कॉमेंट्री सोडली. त्यानंतर आजाराला हरवून त्यांनी बंगाल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
अरुण लाल यांनी आपल्या कारकिर्दीत 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले.
अरुण लाल यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अरुण लाल यांना त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय शतक झळकावता करता आले नाही. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 156 सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी 30 शतके झळकावत एकूण 10421 धावा केल्या. अरुण लाला यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 27 जानेवारी 1982 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला. तर शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध एप्रिल 1989 मध्ये किंग्स्टन कसोटीत खेळला गेला होता.