माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय “ऋषभ पंतला T20 विश्वचषकातून बाहेर ठेवणे भारतासाठी सर्वोत्तम”
आशिया चषकात गोलंदाजांनी अधिक खराब कामगिरी केली होती. त्यामुळे सिलेक्शन टीम आणि व्यवस्थापनावरती टीका झाली होती.
T20 विश्वचषकासाठी टीम इंडियातील (Team India) खेळाडूंची निवड झाल्यापासून सिलेक्शन टीमवरती अनेकांनी टीका केली होती. कारण आशिया चषकात (Asia cup 2022) खराब कामगिरी केल्यामुळे अनेक खेळाडूंवरती टीका झाली होती. तसेच ऋषभ पंतवरती सुद्धा अनेक माजी खेळाडूंनी शंका उपस्थित केली होती. तसेच त्यावेळी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) असताना सुद्धा खेळवलं नसल्यामुळे अनेकांनी टीका केली होती.
आशिया चषकात गोलंदाजांनी अधिक खराब कामगिरी केली होती. त्यामुळे सिलेक्शन टीम आणि व्यवस्थापनावरती टीका झाली होती. सद्या घरी तंदुरुस्त असलेल्या अनेक खेळाडूंना T20 विश्वचषकासाठी टीममध्ये संधी न दिल्याने टीका झाली होती.
“ऋषभ पंतला T20 विश्वचषकातून बाहेर ठेवणे भारतासाठी सर्वोत्तम असेल” असं वक्तव्य वासिफ या दिग्गज खेळाडूने केले आहे. त्याने एका खासगी वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्याच्याकडून असं मोठ वक्तव्य केलं गेलं आहे.
T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर