Virat Kohli : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे विराट कोहलीबाबत खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाचे चाहते संपातले
PAK च्या माजी कर्णधाराने विराट कोहलीबद्दल केली टिप्पणी, भारतीय चाहते संतापतील!
मुंबई : टीम इंडियाचा (IND) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बांगलादेश (BAN) दौऱ्यावर आहे. मागच्या बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी पारी खेळली. मागच्या अनेक दिवसांपासून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक स्पर्धेत सुद्धा त्याने टीम इंडियाकडून चांगली खेळी केली होती. परंतु टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली अधिक निराश झाला होता.
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक चुकीची कमेंट केल्यामुळे टीम इंडियाचे चाहते अधिक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी राशिद लतीफला अधिक ट्रोल केले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने काल 72 वे शतकं झळकावले. आता विराट कोहलीच्या पुढे फक्त सचिन तेंडूलकर आहे, सचिन तेंडूलकरच्या नावावर 100 शतकांचा महारेकॉर्ड आहे.
राशिद लतीफ हा ज्यावेळी काल एका युट्यूब चॅनेलवरती बोलत होता, त्यावेळी त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विषयी एक वक्तव्य केलं आहे. तो म्हणतो की, विराटने किती ही शतकं मारली, तरी तो टीम इंडियाला विश्वचषकाची ट्रॉफी देऊ शकला नाही. या वाक्यामुळे टीम इंडियाचे चाहते राशिद लतीफविरुद्ध प्रचंड चिडले आहेत.