Asad Rauf : पाकिस्तानचे माजी आयसीसी एलिट अंपायर असद रऊफ यांचे निधन
असद रऊफ यांच्यावरती भारतीय क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. असद रऊफ यांनी 2013 आयएपीएलमध्ये बुकींकडून काही महागड्या वस्तू घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. त्यामुळे ते त्यावेळी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
Asad Rauf : पाकिस्तानचे माजी आयसीसी एलिट अंपायर असद रऊफ यांचे निधनImage Credit source: twitter
एकेकाळी क्रिकेटचा (Cricket) काळ गाजवणारे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू (Pakistan) असद रऊफ (Asad Rauf) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधनं झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. विशेष म्हणजे अनेक वर्षे असद रऊफ यांनी मॅचसाठी पंच म्हणून काम केल्यामुळे ते कायम चाहत्यांच्या लक्षात राहतील. अचानक निधनाची बातमी समजल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Sad to know about the news of former ICC umpire Asad Rauf’s demise…May Allah grant him magfirat and give his family sabr Ameen ???? pic.twitter.com/VyplFGX6gT
असद रऊफ यांच्या निधनानंतर पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. काही दिवसांपुर्वी असद रऊफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी रऊफ लाहोरमधील लांडा बाजार येथे चप्पला विकत असल्याचे व्हिडीओ दिसत होते. ते दुकान त्यांच्या मालकीचं असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे.
Shocking Asad Rauf aged 66 years has passed away, a sequel to sudden cardiac arrest. Ex NBP & PNSC first class player who played 71 FC & 40 List A matches. He was an ICC Elite panel umpire. He saw the lows but sustained all pressures.
Inna Lillahi wa inna ilayhi raji’un pic.twitter.com/P0NZ2BNNoq
असद रऊफ यांच्यावरती भारतीय क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. असद रऊफ यांनी 2013 आयएपीएलमध्ये बुकींकडून काही महागड्या वस्तू घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. त्यामुळे ते त्यावेळी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
पाकिस्तानचे माजी आयसीसी एलिट अंपायर असद रौफ यांनी पंच म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरचे काम केले आहे.