नवी दिल्ली : आज अशा एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे की ज्याच्यासाठी दुर्दैवी किंवा कमनशिबी हे शब्द बनले असावेत. या खेळाडूने पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 95 धावा ठोकल्या. पण त्याची कसोटी कारकीर्द चार सामन्यांनंतरच संपुष्टात आली. वयाच्या 21 व्या वर्षी जगातील बहुतेक खेळाडूंची कारकीर्द सुरु होते, परंतु या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या 21 व्या वर्षी संपली. तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी विकेटकीपर अब्दुल कादिर (Abdul kadir)… (Former Pakistan Player Abdul Kadir Cricket Career Story)
अब्दुल कादिर याचा जन्म 10 मे 1944 रोजी कराची येथे झाला होता. ऑक्टोबर 1964 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघात त्याची निवड झाली होती. त्याच्यासह आणखी पाच नवीन खेळाडू त्या संघाचा हिस्सा होते. हा सामना कराचीमध्ये खेळला गेला. अब्दुल कादिरला पदार्पण करण्याची संधी मिळाली. 20 वर्षीय कादिरने बिल्ली इब्दुल्लाह बरोबर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी मिळून 249 धावांची सलामी भागीदारी केली. त्यावेळी पाकिस्तानसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी होती. सलामीची पाकिस्तानसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा या जोडीचा विक्रम 1997-98 पर्यंत कायम होता.
इब्दुल्लाहने 166 धावांची खेळी केली परंतु अब्दुल कादिरचं पदार्पणातील कसोटी सामन्यात शतक पाच धावांनी हुकलं. 95 धावांवर तो धावबाद झाला. याच कसोटी सामन्यात विकेट किपींग त्याने एक स्टम्पिंग केलं. क्रिकेटमधील त्याचं ते पहिलं आणि शेवटचं स्टम्पिंग ठरलं.
दीड महिन्यानंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला. मेलबर्न कसोटीदरम्यान कादिरचा ग्रॅहम मॅकेन्झीच्या चेंडूवर अंगठा तोडला. दुसर्या डावात फलंदाजीसाठी तो सातव्या क्रमांकावर आला. त्याने 35 धावांची खेळी केली आणि कर्णधार हनिफ मोहम्मदबरोबर 46 धावांची भागीदारी रचली. कादिरच्या दुखापतीमुळे हनीफ मोहम्मदने कीपरची जबाबदारी सांभाळली आणि यष्टीमागे पाच बळी घेतले.
ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला गेला. तिथं अब्दुल कादिर फक्त फलंदाज म्हणून खेळला. पहिल्या कसोटीत त्याने 46 धावा केल्या. दुसर्या कसोटी सलामीच्या येऊन त्याने 12 आणि 58 धावा केल्या. 58 धावांच्या खेळीच्या वेळी त्याने 5 तास फलंदाजी केली. पण या खेळीनंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. त्याने चार कसोटींमध्ये 34 च्या सरासरीने 272 धावा केल्या.
त्याचवेळी अब्दुल कादिरने फर्स्ट क्लासच्या 36 सामन्यांत 28.73 च्या सरासरीने 1523 धावा केल्या. त्याच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. वयाच्या 57 व्या वर्षी 12 मार्च 2002 रोजी कराची येथे अब्दुल कादिरचं निधन झालं.
(Former Pakistan Player Abdul Kadir Cricket Career Story)
हे ही वाचा :
Video : चहलची बायको धनश्रीच्या आईचा Mothers Day ला श्रद्धा कपूरच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीने वाचवला, आर अश्विनने सांगितला भावूक प्रसंग
न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’