ढाका : क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे. बांगलादेशच्या मोहम्मद सोझीबने (Mohammad Sozib) वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आत्महत्या करत, जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकारामुळे क्रिकेट आणि क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. सोझीबची 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत (Bangladesh Under19 Cricketer) स्टॅंडबाय खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. former under 19 Bangladesh Cricketer Mohammad Sozib commits suicide at the age of 21
सोझीबने दुर्गापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. स्थानिक पोलिसांनी आत्महत्येची पुष्टी केली आहे. मात्र आत्महत्येचे कारण समजले नाहीये. सोझीब युवा प्रतिभावान खेळाडू होता. सोझीब सारख्या खेळाडूने आत्महत्या केल्याने क्रीडा विश्व हळहळला आहे. विविध स्तरातून सोझीबच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद मेहमूद यांनी मोहम्मद सोझीबच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“सोझीबच्या आत्महत्येचे वृत्त समजले. मी जे ऐकले त्यावर माझा विश्वास बसत नाही. मला ही बातमी समजल्यावर वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद मेहमूद यांनी दिली. सोझीब 2008 मध्ये राजशाही बांगला या अॅकेडमीत सराव करायचा. त्यावेळेस खालिद मेहबुब हे त्या अॅकेडमीचे प्रमुख होते. सोझीब हा सलामीवीर आणि मध्यमगती गोलंदाजी करायचा.
“सोझीब नक्कीच बांगलादेशसाठी खूप वर्ष क्रिकेट खेळेल. तो क्रिकेट अॅकेडमीत कठोर सराव करायचा. त्याच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून मला फार वाईट वाटले”, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू तन्मय घोषने दिली.
मोहम्मद सोझीब हा डावखुरा सलामीवीर फलंदाज होता. त्याने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना शाईनपुकुर क्रिकेट क्लबच्या 2017-18 मधील ढाका प्रिमिअर लीगमध्ये खेळला होता. या व्यतिरिक्त सोजीबने 2017 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध 3 यूथ एकदिवसीय सामने खेळला होता. इतकेच नाही तर सोझीबला 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली होती. सोझीबने आपल्या कारकिर्दीत 3 लिस्ट ए सामने खेळले होते.
दरम्यान 12 ऑगस्टला आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले होते. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
संबंधित बातम्या :
विरारच्या ऑलराऊंडर क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या
Karan Tiwary | आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास
former under 19 Bangladesh Cricketer Mohammad Sozib commits suicide at the age of 21