शतकांचा चौकार, षटकारांचा पाऊस, रोहित शर्माने धोनी आणि संगकाराला मागे टाकलं
संगकाराने 2015 च्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यासोबतच सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय होण्याचा मानही रोहित शर्माने मिळवलाय. या यादीत त्याने महेंद्र सिंह धोनीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. 104 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला.
लंडन : बांगलादेशविरुद्ध हिटमॅन रोहित शर्माने या विश्वचषकातलं चौथं षटक ठोकलंय. यासोबतच त्याने एका विश्वचषकात चार शतकं ठोकण्याचा श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. संगकाराने 2015 च्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यासोबतच सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय होण्याचा मानही रोहित शर्माने मिळवलाय. या यादीत त्याने महेंद्र सिंह धोनीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. 104 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला.
रोहित शर्माच्या या विश्वचषकातील चौथ्या शतकाने अनेक विक्रम मोडित काढले आहेत. एका विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम आतापर्यंत माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता. हा 03 शतकांचा विक्रम मागे टाकत रोहित शर्माने चौथं शतकही पूर्ण केलं. शिवाय या विश्वचषकात सर्वाधिक धावाही रोहितच्या नावावर जमा झाल्या आहेत. एकाच विश्वचषकात एवढ्या धावा करणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज ठरलाय. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माच्या नावावर आता 544 धावा जमा झाल्या आहेत. भारत आणखी एक सामना श्रीलंकेसोबत खेळणार असून त्यानंतर सेमीफायनल होईल.
सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय
रोहित शर्मा – 230
एमएस धोनी – 228
सचिन तेंडुलकर – 195
सौरव गांगुली – 190
युवराज सिंह – 155
सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 351
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 326
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 270
रोहित शर्मा (भारत) – 230
एमएस धोनी (भारत) – 228
विश्वचषकातील 15 डावात पाच शतकं
रोहित शर्माने विश्वचषकात खेळलेल्या 15 डावांमध्ये पाचवं शतक ठोकलंय. विश्वचषकात सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर अजूनही पुढे आहे. सचिनच्या नावावर 44 डावांमध्ये 6 शतकं आहेत. पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. विशेष बाब म्हणजे रोहित शर्माने या दिग्गजांची केवळ 15 डावांमध्ये बरोबरी केली आहे.
विश्वचषकातील शतकं आणि इनिंग
सचिन तेंडुलकर – 6 (44)
रिकी पाँटिंग – 05 (42)
कुमार संगकारा – 05 (35)
रोहित शर्मा – 05 (15)
1 जानेवारी 2017 नंतरची शतकं
रोहित शर्मा – 16 (60 इनिंग)
विराट कोहली – 15 (57 इनिंग)
जॉनी बेअरस्टो (47), शिखर धवन (56), जो रुट (59), एरॉन फिंच (40) – 08