टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांचंही नाव, सेहवाग, जयवर्धनेही शर्यतीत!

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक (Team India head coach) पदासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांचंही नाव, सेहवाग, जयवर्धनेही शर्यतीत!
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 11:30 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक (Team India head coach) पदासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपल्याने, बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाची (Team India head coach) नियुक्ती करणार आहे. सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. तोपर्यंत रवी शास्त्रींकडेच (Ravi Shastri) प्रशिक्षकाचा भार आहे. रवी शास्त्रीही पुन्हा प्रशिक्षकपदासाठी इच्छुक आहेत. त्यांना अर्ज करण्याची गरज नाही, ते थेट मुलाखत देतील.

रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असले, तरी या यादीत अनेक दिग्गजांची नावं आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाला 2011 मध्ये विश्वविजेता बनवणारे कोच गॅरी कर्स्टन हे सुद्धा इच्छुक असल्याचं कळतंय. याशिवाय श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, टॉम मूडी आणि टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं नावही या यादीत आहे.

कर्स्टन यांच्या कार्यकाळात भारताने 2011 मध्ये विश्वचषक जिंकला, तर जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दोन वेळा आणि टॉम मुडींच्या नेतृत्त्वात सनरायजर्स हैद्राबादने एकदा विजय मिळवला होता.

महेला जयवर्धने

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजारपेक्षा जास्त धावा करणारा जयवर्धनेने श्रीलंकेचं कर्णधारपद भूषवलं होतं. 2015 मध्ये तो इंग्लंडचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहात होता. 2017 मध्ये जयवर्धनेची नियुक्ती मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी झाली. 2017 आणि 2019 मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडिन्सने विजेतेपद मिळवलं.

गॅरी कर्स्टन

दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर गॅरी कर्स्टनला भारतीय क्रिकेटची नाडी माहित आहे. गॅरी कर्स्टनच्या कार्यकाळातच धोनीच्या टीम इंडियाने 2011 मध्ये वन डे विश्वचषक जिंकला होता. 2008 ते 2011 या काळात गॅरी कर्स्टन टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी कौटुंबिक कारणांमुळे कर्स्टन यांनी भारतासोबतचा करार पुढे वाढवला नव्हता.

कर्स्टन यांनी पुढे दोन वर्ष दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2014 -15 मध्ये ते आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्स या संघाचे कोच होते. नुकतंच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही कर्स्टन यांचं नाव चर्चेत होतं.

टॉम मूडी

ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर टॉम मूडी हे गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. 2005 मध्ये जॉन राईट यांच्यानंतर टॉम मूडी हे प्रशिक्षक होण्याची चिन्हं होती, मात्र त्यावेळी ग्रेग चॅपल यांची प्रशिक्षकपदी वर्णी लागली.

टॉम मूडी यांनी श्रीलंकेचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात श्रीलंका 2007 मध्ये विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली होती. आयपीएलमध्ये 2016 मध्ये हैदराबाद सनरायजर्सने विजय मिळवला तेव्हा मूडी हेच प्रशिक्षक होते.

वीरेंद्र सेहवाग

अनिल कुंबळे यांनी 2017 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला, तेव्हा सेहवागला प्रमुख दावेदार मानलं जात होतं. मात्र त्यावेळी सेहवाग तितकासा गंभीर नसल्याने क्रिकेट प्रशासकीय समितीने त्याची नियुक्ती केली नव्हती. सेहवाग 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर होता. सेहवागने टीम इंडियाकडून अनेक धडाकेबाज खेळी केल्या आहेत. मात्र त्याच्याकडे प्रशिक्षकपदाचा कोणताही अनुभव नाही. बीसीसीआयने किमान दोन वर्षाच्या अनुभवाची अट ठेवली आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईला दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं, आता भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.