“टीम इंडियासोबत आलो तेव्हा सचिन तेंडुलकर नाराज होता”, माजी प्रशिक्षकाचा खुलासा

माजी प्रशिक्षकानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत मोठा खुलासा केला आहे. 2007 साली सचिनची मानसिकता कशी होती आणि त्याचा एक निर्णय किती चुकीचा ठरला असता, याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

टीम इंडियासोबत आलो तेव्हा सचिन तेंडुलकर नाराज होता, माजी प्रशिक्षकाचा खुलासा
...तर 80 शतकंही झाली नसती! सचिन तेंडुलकरबाबत माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 7:42 PM

मुंबई : भारत हा क्रिकेट वेडा देश असला तरी आयसीसी स्पर्धेत हवी तशी कामगिरी नाही. त्यामुळे काही माजी क्रिकेटपटू मालिका खेळणारा संघ अशी टीका करतात. आतापर्यंत भारताने दोन वनडे वर्ल्डकप आणि एक टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे.आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताने शेवटचा वर्ल्डकप 2011 साली जिंकला होता.2011 वर्ल्डकप स्पर्धेत प्रशिक्षक गॅरी कर्स्टननं मोलाची भूमिका बजावली होती. मात्र माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सचिन तेंडुलकरबाबत खुलासा केला आहे.एका पॉडकास्ट दिलेल्या मुलाखतीत कर्स्टननं आपला अनुभव शेअर केला आहे. तसेच सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

“मी जेव्हा टीम इंडियासोबत आलो त्यापूर्वी ग्रेग चॅपलमुळे टीम अस्वस्थ होती. काही दिग्गज खेळाडू उदास होते. 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची स्थिती एकदम वाईट होती. मी जेव्हा टीम इंडियाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं तेव्हा संघाला जेतेपद मिळवून देण्याचा हेतू होता. त्यात संघात भीतीचं वातावरण होतं.सचिन तेंडुलकर संघातील त्या वातावरणाने नाराज होता. तसेच निवृत्ती घेण्याचा विचारात होता.तेव्हा सचिनला समजावणं म्हणजे आव्हान होतं. पण त्यानं ऐकलं आणि संघाला मोठं योगदान दिलं.” असं गॅरी कर्स्टननं सांगितलं.

सचिन तेंडुलकर 2013 पर्यंत टीम इंडियासाठी खेळला. सचिननं 2007 साली निवृत्ती घेतली असती तर त्याच्या नावावर 78 शतकं असती. सचिनने तेव्हा कसोटीत 37 आणि वनडेमध्ये 41 शतकं झळकावली होती. आणखी सात वर्षे क्रिकेट खेळून सचिननं शतकाचं शतक साजरं केलं. गॅरी कर्स्टन 2007 ते 2011 या कालावधीत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. गॅरी कर्स्टन आणि एमएस धोनी या जोडीनं टीम इंडियाला 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकून दिला.

सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात 15 नोव्हेंबर 1989 साली पदार्पण केलं होतं. तर 18 डिसेंबर 1989 पाकिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. 14 नोव्हेंबर 2013 रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला. तर 18 मार्च 2012 रोजी शेवटचा वनडे सामना खेळला. सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकमेव टी 20 सामना खेळला आहे. सचिन तेंडुलकर 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामना खेळला आहे. कसोटीत सचिननं 51 शतकं, 6 द्विशतकं आणि 68 अर्धशतकं झळकावली आहेत. वनडेमध्ये 46 शतकं, 1 द्विशतक आणि 96 अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटीत 46 गडी, वनडेत 154 गडी आणि टी 20 मध्ये 1 गडी बाद केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.