गौतम गंभीरकडून संजू सॅमसनचं कौतुक, चाहते म्हणाले, रिषभचं करिअर संकटात
संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जविरोधात 32 बॉलमध्ये 9 सिक्सच्या मदतीने 74 धावा केल्या. या खेळीमुळे संजूचे गंभीरने कौतुक केले. Gautam Gambhir appreciate sanju samsons batting
नवी दिल्ली- टीम इंडियाचा माजी सलामीवर गौतम गंभीरने राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे (Sanju Samson) तोंड भरुन कौतुक केले आहे. आयपीएलच्या चौथ्या सामन्यात संजू सॅमसनने झंझावाती फलंदाजी केली. संजूने चेन्नई सुपर किंग्जविरोधात अवघ्या 32 चेंडूत तब्बल 9 षटकार ठोकत 74 धावा कुटल्या. संजूच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईसमोर विजयासाठी तब्बल 217 धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना राजस्थानने 16 धावांनी जिंकला. (Gautam Gambhir appreciate sanju samsons batting)
दरम्यान, संजूच्या जबरदस्त फलंदाजीचं जगभरातून कौतुक होत आहे. गौतम गंभीरनेही संजूचं तोंड भरुन कौतुक केले. “संजू सॅमसन हा भारतातील केवळ चांगला यष्टीरक्षक फलंदाज नाही तर तो भारतातील सध्याचा सर्वोत्तम तरुण फलंदाज आहे. यात वादच नाही”, असं ट्वीट गंभीरने केले.
Sanju Samson is not just the best wicketkeeper batsmen in India but the best young batsman in India! Anyone up for debate?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 22, 2020
गंभीरसह सोशल मीडियावर अनेकांनी संजू सॅमसनच्या खेळीची प्रशंसा केली. काही नेटीझन्सनी तर संजूची तुलना दिल्ली कॅपिटलचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतशी केली. तसंच संजूमुळे पंतचं करिअर संकटात आल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी दिल्या.
दरम्यान, संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नसल्यानेही गंभीरने आश्चर्य व्यक्त केलं आहे. “संजू सॅमसन हा भारतातील चांगला युवा फलंदाज असूनही त्याला संघात स्थान मिळत नाही हे समजत नाही. मात्र, इतर संघ त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असतात”, असे गौतम गंभीर म्हणाला.
संजू सॅमसनची तुफानी खेळी
दरम्यान, आयपीएलमधील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या 6 धावा करुन माघारी परतला.
त्यांनंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजू सॅमसने स्फोटक खेळी करायला सुरुवात केली. संजूने मैदानात आल्याआल्या मोठे फटके लगावले. दुसऱ्या विकेटसाठी संजू सॅमसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. तुफानी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला चेन्नईच्या एन्गिडीने बाद केले. संजूने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांच्या सहाय्याने 74 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत केली. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र, चेन्नईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 200 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 16 धावांनी पराभव झाला.
चेन्नईकडून फॅफ डू प्लेसीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर शेन वॉटसननेही 33 रन्स केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
रिषभ पंतवर नेटीझन्सचा निशाणा
संजू सॅमसनच्या तुफानी खेळीनंतर क्रिकेट चाहत्यांनी रिषभ पंतवर निशाणा साधला. “पंतला अनेक संधी मिळाल्या आहेत. त्यामध्ये तो चमक दाखवू शकला नाही. निवड समितीने आता संजू सॅमसनच्या नावाचा विचार केला पाहिजे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या.
संबधित बातम्या:
IPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड
(Gautam Gambhir appreciate sanju samsons batting)