IPL नाही, तर धोनी पुनरागमन कसं करणार? : गौतम गंभीर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एकदा पुन्हा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

IPL नाही, तर धोनी पुनरागमन कसं करणार? : गौतम गंभीर
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 5:19 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) एकदा पुन्हा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीबाबत ( Mahendra Singh Dhoni) एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर यंदा आयपीएलचे सामने झाले नाहीत किंवा आयपीएलचं आयोजनच केलं नाही तर, महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघात पुनरागमन करणं आणखी कठीण होईल, असं गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला.

धोनी गेल्या अनेक काळापासून मैदानापासून दूर आहे आणि जर आयपीएल झालं नाही तर तो कशाच्या आधारे पुनरागमन करणार? गेल्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर धोनी मैदानावर उतरलेला नाही. विश्वचषकानंतर धोनी भारतीय सेनेसोबत एका ‘असाइनमेंट’वर गेला होता. त्यानंतरही तो सिलेक्शनसाठी उपस्थित नव्हता.

यादरम्यान, बीसीसीआयने (BCCI) वार्षिक कराराची यादी जाहीर केली. या यादीत महेंद्र सिंग धोनीचं नाव नव्हतं. तेव्हापासून धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर अनेक मोठ्या खेळाडूंच्या प्रतिक्रियाही आल्या. काहींनी धोनीच्या समर्थनात प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी धोनीला निवृत्तीचे सल्लेही दिले (Gautam Gambhir). मात्र, धोनीने आजपर्यंत या विषयावर मौन साधलं आहे.

मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी आपला खेळ आणि फिटनेस तपासेल, स्वत:चं परिक्षण करेल आणि जर तो यामध्ये यशस्वी ठरला. तर तो भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत बीसीसीआयच्या व्यवस्थापनाला माहिती देईल. इतकंच नाही तर खेळ आणि फिटनेसच्या जोरावर धोनी येत्या टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत दावा करु शकतो, अशीही चर्चा होती.

पण सध्या परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कोरोना विषाणूचं सावट आयपीएलवरही आहे. शिवाय, टी-20 विश्वचषक वेळेवर सुरु होणार की नाही याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे सध्या धोनीकडे त्याचा खेळ आणि फिटनेस दाखवण्याची कुठलीही संधी नाही.

धोनीला पर्याय म्हणून केएल राहुल?

गौतम गंभीरच्या मते केएल राहुल हा धोनीच्या जागी एक चांगला पर्याय ठरु शकतो. टी-20 विश्वचषकासाठी केएल राहुलच्या नावावर विचार करायला हवा, असा सल्लाही गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दिला आहे.

संबंधित बातम्या :

क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ‘टोक्यो ऑलिम्पिक 2021’च्या तारखा जाहीर

IPL 2020 | बीसीसीआयचं एक पाऊल मागे, आयपीएल लांबणीवर!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल क्लिन बोल्ड, भारतीय परंपरेनुसार साखरपुडा

VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा ‘DSP’ रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.