विराट कोहलीच्या बंगळुरुने पेटारा उघडला, ग्लेन मॅक्स्वेलसाठी मोजले 14,25,00,000 रुपये

Glenn Maxwell SOLD to RCB किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) तगडी बोली लागली.

विराट कोहलीच्या बंगळुरुने पेटारा उघडला, ग्लेन मॅक्स्वेलसाठी मोजले 14,25,00,000 रुपये
Glenn Maxwell bid ipl auction
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:49 PM

Glenn Maxwell bid ipl auction चेन्नई : आयपीएल लिलावात अनेक खेळाडू कोट्यवधींची उड्डाणं घेत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) तगडी बोली लागली. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अखेर विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं.

मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. मात्र चेन्नई आणि बंगळुरुने मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यात मोठी बोली लावली. त्यातच कोलकातानेही उडी घेत, मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला. चेन्नईने 6 कोटीपर्यंत बोली लावत लावत पुढे गेले. मात्र बंगळुरुने पेटारा उघडून तब्बल 14.25 कोटी रुपयांत मॅक्स्वेलला आपल्या संघात घेतलं.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) फ्रँचाजींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. सर्व फ्रँचायजी मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक होते. मॅक्सवेलला पंजाबने रिलीज केलं होतं. त्याची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी आहे.

मॅक्सवेलसाठी बंगळुरुकडून 14 कोटी 25 लाख

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. बंगळुरुने मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटी 25 लाख इतकी रक्कम मोजली आहे. मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. मॅक्सवेलला 2020 मध्ये पंजाबने 10 कोटी 75 लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं होतं.

आयपीएल ऑक्शन पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

IPL Auction 2021 Live | अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल क्लिन बोल्ड, भारतीय परंपरेनुसार साखरपुडा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.