IND vs WI: भारताच्या विजयामध्ये गोलंदाजांचे योगदान अन् कर्णधाराचा सल्ला आला टीम इंडियाच्या कामी

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले असले तरी सुरवातीच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक राहिलेली होती. सलामीला उतरलेले सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यासारखे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. धावसंख्येचा आलेख चढता ठेवायचा असल्यास क्रीजवक टिकून राहणे हेच महत्वाचे होते आणि तेच रोहित शर्मा व दिनेश कार्तिक यांनी केले.

IND vs WI: भारताच्या विजयामध्ये गोलंदाजांचे योगदान अन् कर्णधाराचा सल्ला आला टीम इंडियाच्या कामी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 9:26 AM

मुंबई : वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद येथे पार पडलेल्या पहिल्या (T-20 Match) टी-20 सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला आहे. यामध्ये 191 एवढ्या धावांचा डोंगर उभा करुन देखील वेस्ट इंडिजकडे असलेल्या फलंदाजीच्या भरगच्च यादीसमोर निभाव लागतो की नाही अशी स्थिती होती. शिवाय (West Indies) इंडिज फलंदाजांनी सुरवातही दणक्यात केली. सामना रंगात येत असतानाच भुवनेश्वर कुमार याने अर्शदीपने मेयर्सला बाद केले. पहिली विकेट गमावल्यानंतर लागलेली गळती पुन्हा इंडिज फलंदाज रोखू शकले नाही. तर मॅचला सुरवात होण्यापूर्वी (Rohit Sharma) कर्णधार रोहित शर्मा याने खेळाडूंना दिलेला सल्लाही तेवढाच कामी आला आहे. अधिकच्या धावा करण्यासाठी स्पीचवर टिकून राहणे महत्वाचे असल्याचे त्यांने सांगितले होते. त्यामुळेच पहिल्या विकेट गेल्या तरी तो आणि दिनेश कार्तिक यांनी एक आव्हानात्मत धावसंख्या केली. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी आणि कर्णधाराचा सल्ला पहिल्या सामन्यात उपयोगी ठरलेला आहे.

रोहित शर्माकडून फलंदाजांना सल्ला

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले असले तरी सुरवातीच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक राहिलेली होती. सलामीला उतरलेले सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यासारखे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. धावसंख्येचा आलेख चढता ठेवायचा असल्यास क्रीजवक टिकून राहणे हेच महत्वाचे होते आणि तेच रोहित शर्मा व दिनेश कार्तिक यांनी केले. रोहित म्हणाला, “आम्हाला माहित होते की हे थोडे कठीण होणार आहे, सुरुवातीला शॉट मारणे सोपे नव्हते. क्रीजवर गोठलेल्या खेळाडूंनी बराच काळ फलंदाजी करावी आणि ज्या पद्धतीने आम्ही पहिला डाव संपवला, तो एक चांगला प्रयत्न होता.”

अपेक्षेपेक्षा अधिक धावा

इंडिज समोर 191 धावांचा डोंगर उभा राहिला असला तरी एवढ्या धावा होतील अशी अपेक्षा कर्णधार रोहित शर्माला देखील नव्हती. हे त्यानेच कबुल केले आहे. 10 ओव्हरपर्यंतही आपण एवढ्या धावा करु शकताल असे त्याला वाटलेले नव्हते. मात्र, सर्वांनीच अंतिम टप्प्यात कामगिरी केल्याने ह्या धावा करता आल्या. विजयासाठी आवश्यक असलेले तीन टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करीत असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.