दुबई : सहा महिन्यांनंतर आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (International Cricket Council) नवा अध्यक्ष मिळाला आहे. न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आयसीसीने याबद्दलची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. शंशाक मनोहर (Shashank Manohar) यांच्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. बार्कले यांनी इमरान ख्वाजांचा (Imran khwaja) 11-5 अशा फरकाने पराभव करत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. ग्रेग बार्कले हे 2012 पासून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. Greg Barclay has elected Chairperson of International Cricket Council
शंशाक मनोहर यांनी जून 2020 मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून या आयसीसीच्या अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी आयसीसीचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष इमरान ख्वाजांना देण्यात आली होती. शंशाक मनोहर यांनी 22 नोव्हेंबर-30 जून 2020 या दरम्यान आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
Greg Barclay has been elected as the new Independent Chair of the International Cricket Council.
Barclay joins from New Zealand Cricket where he has been a director since 2012 and also served as a director of the 2015 ICC @cricketworldcup.
Read more ?
— ICC (@ICC) November 24, 2020
ग्रेग बार्कले हे आयसीसीमध्ये न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान आता अध्यक्षपदी निवड झाल्याने ते आपल्या या पदाचा राजीनामा देतील. बार्कले क्रिकेटचे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बार्कले यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. तसेच बार्कले यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील अनेक कंपन्यांचे संचालक पदी काम केल्याचा अनुभव आहे.
“आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होणं ही अभिमानास्पद बाब आहे. ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली मी त्या सर्वांचा आभारी आहे. कोरोनाच्या खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत क्रिकेटचा विकास करण्याचं काम केलं, यासाठी मी इमरान ख्वाजा यांना धन्यवाद देतो. कोरोनाच्या संकटातही आपण सर्व एकमेकांच्या साहाय्याने आणखी जोमाने काम करु. मी आयसीसीच्या 104 सदस्यांना सोबत घेऊन माझी जबाबदारी पार पाडेन”, अशी प्रतिक्रिया बार्कले यांनी दिली.
दरम्यान आयसीसीने लवकरच दशकातील सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटूंना सन्मानित करणार आहे. यासाठी आयसीसीने मंगळवारी या पुरस्कारांसाठी खेळाडूंना नामांकन दिलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला सर्वाधिक 5 पुरस्कारांसाठी नामांकनं मिळाली आहेत.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | रेट्रो जर्सीमधील ‘गब्बर’ शिखर धवनचा किलर लूक
Greg Barclay has elected Chairperson of International Cricket Council